VIDEO : हे माकड आपल्यापेक्षाही चांगले कपडे धुतं! हे तिन्ही VIDEO बघाच

अलीकडेच सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर अगदी शहाण्यासारखं नळ बंद केला. आता आणखी एका माकडाचा कपडे धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 07:34 PM IST

VIDEO : हे माकड आपल्यापेक्षाही चांगले कपडे धुतं! हे तिन्ही VIDEO बघाच

मुंबई, 7 ऑगस्ट : अलीकडेच सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर अगदी शहाण्यासारखं नळ बंद केला. माकडाने माणसांना दिलेला हा मोठा धडा होता. त्यामुळे माकडांना मर्कटलीला असं म्हणून हिणवणारे आपण सगळेच विचारात पडलो.आता आणखी एका माकडाचा कपडे धुतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरिष्ठ वनाधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे माकड अगदी माणसांसारखं दगडावर कपडे आपटून आपटून धुतं आहे. त्याचबरोबर कपडे पिळण्याचंही कसब त्याने आत्मसात केलंय.

Loading...

या व्हिडिओमध्ये माकडाचं हे कौशल्य पाहून कौतुकाने हसणाऱ्यांचेही आवाज रेकॉर्ड झालेत. या माकडाने माणसांना कपडे धुताना पाहून किती बरोब्बर अवलोकन केलं यामुळेच सगळे थक्क झालेत. या माकडांकडून आपण खूपच शिकण्यासारखं आहे.

असाच एक लक्ष्मी नावाच्या वानराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही वानरीण शाळेतली कायमची विद्यार्थी बनलीय. ती मुलांसोबत धडे घेते, शाळेतल्या कर्मचाऱ्यांसोबत मस्ती करते, मुलांसोबत कवायतीही करते.

पाणी पिऊन नळ बंद करणाऱ्या माकडाच्या व्हिडिओवरही खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. हे माकड तर पाणी वाचवण्याचा संदेश देतं.

=======================================================================================================

VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...