लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

दिल्ली, गुरुग्राम आणि पाटणा येथील लालू प्रसाद यादव यांच्या २२ मालमत्तांच्या ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या ठिकाणांवर आयकर अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे.

  • Share this:

16 मे : पी. चिदंबरम यांच्यानंतर आता बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावरही आयकर विभागानं कारवाई केलीय. दिल्ली, गुरुग्राम आणि पाटणा येथील लालू प्रसाद यादव यांच्या २२ मालमत्तांच्या ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या ठिकाणांवर आयकर अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे.

लालूंवर 1 हजार कोटीच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या संबंधित कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

लालूंच्या विरोधात बिहारचे भाजप नेते सुशील कुमार मोदींनी बेहिशेबी संपत्तीबद्दल आरोप केले होते. पण नितीश कुमार सरकारच्या काळात त्यांना क्लीन चिट मिळाली होती. १९९० ते ९७ दरम्यान मुख्यमंत्री असताना लालू प्रसाद यांनी एक हजार कोटींचा चारा घोटाळा केल्या आरोप आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे.

First Published: May 16, 2017 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading