CM कमलनाथ यांच्या सहकाऱ्यांवर छापासत्र सुरूच, 40 तास 50 ठिकाणं आणि 9 कोटी

गेल्या 40 तासांपासून मध्यप्रदेशसह देशभरातल्या 50 ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 07:05 PM IST

CM कमलनाथ यांच्या सहकाऱ्यांवर छापासत्र सुरूच, 40 तास 50 ठिकाणं आणि 9 कोटी

भोपाल 8 एप्रिल : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित अधिकारी आणि जवळच्या लोकांवर आयकर विभागाचं सुरू असलेलं छापासत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं. या कारवाईमुळे मध्यप्रदेशात खळबळ निर्माण झाली आहे. या छाप्यातून 9 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. तर हे छापे राजकीय कारणांमुळे घातले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमननाथ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड यांच्या विश्वासातले प्रतीक जोशी आणि अश्विन शर्मा यांच्या निवासस्थानी हे छापे घालण्यात आले होते. या कारवाईची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. गेल्या 40 तासांपासून मध्यप्रदेशसह देशभरातल्या 50 ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. भोपाळ, दिल्ली, कोलकता आणि गोव्यात ही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी CRPF च्या जवानांची मदत घेण्यात आली आहे. CRPF  आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्येही वादही झाला होता.

या छाप्यांमध्ये मोठं घबाड मिळाल्याचा अंदाज सुत्रांनी व्यक्त केलाय. पैसे मोजण्यासाठी आणखी काही मशिन्स अधिकाऱ्यांनी मागवल्या आहेत.

कोण आहेत प्रविण कक्कड?

Loading...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रविण कक्कड यांच्या घरावर आयकर विभागानं छापा मारला. इंदूरमधील घरावर ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या अत्यंत जवळचे असलेले प्रविण कक्कड यांनी आपला सर्वाधिक काळ हा पोलीस सेवेत घालवला आहे. राष्ट्रपती पदकानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पण, आयकर विभागानं मारलेल्या छाप्यामुळं आता प्रविण कक्कड चर्चेत आले आहेत.

जीवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रविण कक्कड यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य देखील केलं आहे.

प्रविण कक्कड काँग्रेस नेत्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. 2004 ते 2011 या काळात त्यांनी कांतिलाल भूरिया यांचे ओएसडी म्हणून कम केलं आहे. शिवाय, कृषी आणि आदिवासी मंत्रालयामध्ये काम करण्याचा देखील त्यांना अनुभव आहे.

2011मध्ये कांतिलाल भूरिया मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रविण कक्कड यांनी निवडणुकांची जबाबदरी अंत्यत जबाबदारीनं पार पाडली. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसनं 2015मध्ये झाबुआ लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. मोदी लाटेत त्यांनी ही कामगिरी केली होती.

कालानंतर कमलनाथ आणि प्रविण कक्कड यांची ओळख वाढली आणि कक्कड यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. 2018मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. यावेळी त्यांनी वॉर रूमच्या प्रभारीपदाची जबाबदारी पार पाडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...