मध्य प्रदेश: मुख्यमंत्र्यांचा भाचा आणि सचिवांच्या घरावर छापा, 9 कोटी सापडले!

मध्य प्रदेश: मुख्यमंत्र्यांचा भाचा आणि सचिवांच्या घरावर छापा, 9 कोटी सापडले!

मध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

इंदूर, 07 एप्रिल: मध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजी पोलिस अधिकारी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. प्राथमिक माहितीनुसार कक्कड यांच्या घरातून 9 कोटी रुपये सापडले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कक्कड आणि राजेंद्र कुमार मिगलानी यांची चौकशी सुरु केली आहे.

कक्कड यांच्यासह आयकर विभागाने मुख्यमंत्र्यांचा भाचा रातुल पुरी आणि त्यांचे सल्लागार राजेंद्र कुमार मिगलानी यांच्या घरावर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने इंदूर, दिल्ली, भोपाळ आणि गोवासह 50 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात 9 कोटी जप्त करण्यात आले आहेत. अर्थात याबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कक्कड यांच्या घरावर एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने छापा टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सेवेत असताना देखील कक्कड यांची विविध प्रकरणात चौकशी सुरु होती. कक्कड यांच्या विजय नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला आहे.त्याच कक्कड यांच्याशी संबंधित नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील 15 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकण्यात आले आहेत.

आयकर विभागाने इंदूर येथे मध्यरात्री 3 वाजता छापा टाकला. येथील कक्कड यांच्या स्किम नंबर 74 येथील निवासस्थानावर आयकर विभागाच्या 15 अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कक्कड यांच्या विजय नगर येथील शो रुम आणि अन्य ठिकाणी देखील छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कक्कड जेव्हा सेवेत होते तेव्हा त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकरणाची चौकशी सुरु होती.

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

First published: April 7, 2019, 8:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading