नवी दिल्ली, 9 जून : देशभरातल कोरोनाचा कहर सुरू असल्याने अद्याप शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यात शाळा, महाविद्यालयं सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची (syllabus) व्याप्ती पाहता मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (HRD minister Dr Ramesh Pokhariyal Nishank) यांनी नुकतेच एक मोठी शक्यता वर्तवली आहे. मंत्रालयाकडून अभ्यासक्रम कमी करण्याच्या विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
In view of the current circumstances and after receiving a lot of requests from parents and teachers, we are contemplating the option of reduction in the syllabus and instructional hours for the coming academic year: Ramesh Pokhriyal, Union Human Resource Development Minister pic.twitter.com/4fooL4BZIc
यासह वर्गांची वेळही कमी करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकांकडून याबाबत विनंती केली जात होती, त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच हे विधान समोर आलं आहे. कोरोना विषाणूचा कहर सुरू झाल्यापासून शाळा व महाविद्यालये बंद झाली आहेत आणि विद्यार्थी ऑनलाईन, दूरदर्शन किंवा रेडिओवर शिक्षण घेत आहेत.
नुकतेच मनुष्यबळ विकास मंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे खूप ओझे आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडचण आली आणि त्यांना ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागले. शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखणं अत्यंत आवश्यक असल्याचे त्याबाबतही चर्चा झाली.