'सर्जिकल स्ट्राइक'साठी एअर फोर्सला बळ, GSAT-7A चं यशस्वी प्रक्षेपण!

'सर्जिकल स्ट्राइक'साठी एअर फोर्सला बळ, GSAT-7A चं यशस्वी प्रक्षेपण!

लष्कराला दळणवळणासाठी याचा फायदा होणार असून सर्वाधिक फायदा एअर फोर्सला मिळणार आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा,19 डिसेंबर : दळवळणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या GSAT-7A या इस्त्रोच्या उपग्रहाचं बुधवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रावरुन हा उपग्रह सकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी आकाशात झेपावला. लष्कराला दळणवळणासाठी याचा फायदा होणार असून सर्वाधिक फायदा एअर फोर्सला मिळणार आहे. GSLV-F11 या प्रक्षेपक वाहकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

2,250 किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाचं आयुष्य 8 वर्षांच राहणार आहे. 18 डिसेंबरला या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली होती. ठरवल्यानुसार सर्व गोष्टी पार पडल्या आणि हे प्रक्षेपण यशस्वी झालं असं इस्त्रोन म्हटलं आहे.

एअर फोर्सला कसा होणार फायदा?

  • या उपग्रहाचा सर्वात जास्त फायदा एअर फोर्सला होणार आहे
  • एअर फोर्सचे सर्व रडार केंद्र  परस्परांशी सॅटेलाइटने जोडले जातील.
  • सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करताना आता जमिनीवरुन संपर्क न साधता थेट उपग्रहाव्दारे संपर्क करणं सोपं होणार आहे.
  • त्यामुळं कारवाई करताना सर्व यंत्रणांमध्ये चांगला समन्वय राहू शकतो.
  • सर्व अवॉक्स विमान आता आकाशातून इतर विमानांशी आणि हवाईतळाशी संपर्क ठेवू शकतील.
  • अवॉक्स विमानं हे हवाई हल्ले आणि नियंत्रणासाठी वापरलं जातं.
  • एअर फोर्सचे आकाशातले डोळे असंही अवॉक्स ला म्हटलं जातं. 400 किलोमिटरच्या परिसरात हे विमान शत्रूंच्या हालचालीवर करडी नजर ठेवतं.
  • ड्रोन च्या मदतीने करण्यात येणाऱ्या कारवाईसाठीही आता मदत होईल.

First published: December 19, 2018, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading