S M L

इस्त्रोची आणखी एक भरारी, जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्त्रोनं दक्षिण आशियायी उपग्रह भारतानं यशस्वीपणे प्रेक्षपित केलाय. संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

Sachin Salve | Updated On: May 5, 2017 06:46 PM IST

इस्त्रोची आणखी एक भरारी, जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

05 मे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. इस्त्रोनं दक्षिण आशियायी उपग्रह भारतानं यशस्वीपणे प्रेक्षपित केलाय. संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

या यशस्वी प्रक्षेपणाबरोबरच सार्क देशांना या उपग्रहाचा सामाईक वापर करता येणार आहे. पाकिस्तान वगळता सर्वच सार्क देशांना हा उपग्रह वापरता येणार आहे. पंतप्रधानांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. हा उपग्रह प्रेक्षपित करण्यासाठी इस्त्रोला 235 कोटींचा खर्च आलाय.

इस्त्रोच्या या यशस्वी भरारीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे सार्क देशांशी संपर्क साधण्यासाठी नवा मार्ग मोकळा करून दिलाय.

50 मिटर उंच राॅकेटच्या साहाय्याने अंतराळात पाठवलेलं हे सॅटेलाईट शांतिदूताची भूमिका निभावणार आहे. विशेष म्हणजे जीएसएलव्ही राॅकेटची ही 11 वी भरारी होती.

सुरुवातीला या सॅटेलाईलाटला 'सार्क सॅटेलाईट' हे नाव देण्यात आलं होतं. पण पाकिस्तानने भारताच्या या मोहिमेचा भाग होण्यास नकार दिला होता.

Loading...

भारताचं हे 'शांतिदूत सॅटेलाईट' अंतराळात काम करणार आहे. हा एक संचार उपग्रह आहे जो नेपाळ, भुतान, बांग्लादेश, भारत, मालदीव, श्रीलंका आणि अफगानिस्तानला दुरसंचार सुविधा पुरवणार आहे.

सार्क देशांच्या समुहात पाकिस्तान सोडून बाकी सर्व देशांना या उपग्रहाचा फायदा होणार आहे. भारताचे हे पाऊल शेजारी असलेल्या चीनवर प्रभाव टाकण्यास उपयुक्त ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2017 06:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close