इस्त्रोची आणखी एक झेप, आज अवकाशात सोडणार दोन उपग्रह

इस्त्रोची आणखी एक झेप, आज अवकाशात सोडणार दोन उपग्रह

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्त्रो' आज दोन उपग्रह प्रक्षेपीत करणार आहे. पीएसएलव्ही सी- 42 च्या मदतीने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा,ता. 16 सप्टेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्त्रो' आज दोन उपग्रह प्रक्षेपीत करणार आहे. पीएसएलव्ही सी- 42 च्या मदतीने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार असून वर्षभरातलं इस्रोचं हे तिसरं प्रक्षेपण असेल. तर पीएसएलव्ही सी- 42 या प्रक्षेपक वाहकाचं हे 44 वं उड्डाण आहे. शनिवारीच या उड्डाणाची उलटी गिणती सुरू झाली. रविवारी रात्री 10 वाजून सात मिनिटांनी हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत.

पीएसएलव्ही सी 42 आपल्यासोबत 'नोवासर' आणि 'एस 1- 4' हे दोन उपग्रह ही घेऊन जाणार आहे. 800 किलोंच्या या उपग्रहाचा उपयोग वनांचं मॅपिंग आणि पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्यासाठी होणार आहे. या उपग्रहांना ब्रिटनच्या एका कंपनीने विकसित केलं आहे. या उपग्रहांना अवकाशात 583 किमी उंचीवरच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे.

इस्त्रोचं हे या वर्षातलं तिसरं प्रक्षेपण असेल. या आधी जानेवारीत PSLV-C 40 ने कार्टोसॅट 2 हा उपग्रह तर एप्रिल महिन्यात PSLV-C 41 या प्रक्षेपक वाहकाच्या मदतीने IRNSS-1 हा नॅव्हिगेशन उपग्रह सोडला होता. इस्त्रोनं व्यावसायिक उपग्रह सोडण्यात कौशल्य मिळवलं असल्यानं जगातल्या अनेक देशांच्या कंपन्या या आपले उपग्रह सोडण्यासाठी इस्त्रोची मदत घेत असतात. यातून मोठ्या प्रमाणात इस्त्रोला परकीय चलन मिळत असते.

 

 

 

नाना पाटेकरांनी केलं सहकुटुंब गणपतीचं पूजन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2018 12:08 PM IST

ताज्या बातम्या