इस्रो 'शतका'च्या उंबरठ्यावर, येत्या शुक्रवारी सोडणार 31 उपग्रह अंतराळात

इस्रो 'शतका'च्या उंबरठ्यावर, येत्या शुक्रवारी सोडणार 31 उपग्रह अंतराळात

शुक्रवारी 'पीएसएलव्ही -सी-40'मधून हवामानविषयक माहिती देणार्‍या भारताच्या 'कार्टोसॅट-2' मालिकेतील उपग्रहासह 31 उपग्रह सोडण्यात येतील, अशी माहिती 'इस्रो' उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुरई यांनी दिली.

  • Share this:

10 जानेवारी : इस्रो 'शतका'च्या उंबरठ्यावर असून, 12 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी आपल्या 100 व्या उपग्रहासह 31 उपग्रह अंतराळात सोडणार आहे. ऑगस्ट महिन्यात पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या माध्यमातून 'आयआरएनएसएस 1-एच' उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर 'इस्रो'ची ही पहिलीच मोहीम असणार आहे.

शुक्रवारी 'पीएसएलव्ही -सी-40'मधून हवामानविषयक माहिती देणार्‍या भारताच्या 'कार्टोसॅट-2' मालिकेतील उपग्रहासह 31 उपग्रह सोडण्यात येतील, अशी माहिती 'इस्रो' उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुरई यांनी दिली. श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधील शुक्रवारी सकाळी 9.28 वाजता हे सॅटेलाइट लाँच होतील.

इस्रो 'शतका'च्या उंबरठ्यावर

- मिशनचे 100 वं सॅटेलाईट

- मिशन अंतर्गत एकून 31 सॅटेलाईट सोडणार

- भारताचे 3 सॅटेलाइट अंतराळात सोडणार

- मुख्य पे-लोट कार्टोसेट सीरिजचे तिसरं सॅटेलाईट

- उर्वरित 28 हे विदेशी सॅटेलाईट

- भारताचे तिसरं सॅटेलाइट हे मायक्रो सॅटेलाईट

- त्याचे वजन 100 किलोग्रॅम

- हे सर्वात शेवटी ऑर्बिटमध्ये जाईल

- 31 सॅटेलाइट 1323 किलो वजनाचे, अर्धे वजन कार्टोसेटचे

- पीएसएलव्ही-सी40 - 1323 किलोग्रॅम वजनाचे सॅटेलाईट घेऊन जाणार

- कार्टोसेट-2चे वजन 710 किलो, उर्वरित 30 सॅटेलाईटचे वजन 613 किलोग्रॅम

- 28 सॅटेलाईट 6 देशांचे

- कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, यूके आणि यूएसए

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 02:59 PM IST

ताज्या बातम्या