भारत दळणवळण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार; आयआरएनसएस1एचचं आज लाँचिंग

भारत दळणवळण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार; आयआरएनसएस1एचचं आज लाँचिंग

यापूर्वी जीपीएस सिस्टीमसाठी ,नौदल, हवाई दलात दिशा दर्शकात अमेरिकन जीपीएस चां वापर केला जात होता. त्यामुळे कोट्यावधी डॉलर भारताला मोजावे लागत होते. मात्र 1Hच्या प्रक्षेपणनाने संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरता येणार आहे

  • Share this:

श्रीहरीकोटा,31 ऑगस्ट: खाजगी क्षेत्रातील पहिला उपग्रह आयआरएनसएस 1एचचं आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्चिंग सेंटरहून इस्त्रो  लाँच करणार आहे. भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे कारण यामुळे भारत दळणवळण क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकेल.

भारतीय संशोधन संस्था इस्रो कडून संपूर्ण भारतीय बनावटीच्या आयआरएनसएस( Indian regional navigation satellite system) 1एच या उपग्रहाच प्रक्षेपण करण्यात येणार. दळणवळण क्षेत्रातील महत्वाचा भाग यामुळे पूर्ण होणार आहे. यापूर्वी जीपीएस सिस्टीमसाठी ,नौदल, हवाई दलात दिशा दर्शकात अमेरिकन जीपीएस चां वापर केला जात होता. त्यामुळे कोट्यावधी डॉलर भारताला मोजावे लागत होते. मात्र 1एच च्या प्रक्षेपणनाने संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरता येणार आहे. दळणवळण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरेल. यापूर्वी  आयआरएनसएसच्या साखळीतील सात उपग्रहांचं प्रक्षेपण झालेलं आहे. हा आठवा उपग्रह आहे.

हे उड्डाण पीएसएलव्हीसी 39 ने केलं जाणार आहे. या क्षेत्रात यापुढे खासगी क्षेत्र महत्वाची कामगिरी बजावू शकते. या उपग्रहाची निर्मिती अल्फा डिजाइन डिफेन्स इक्वीपमेंट सप्लायर बँगलोर या संस्थेने केली आहे.

First published: August 31, 2017, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading