मराठी बातम्या /बातम्या /देश /

GSAT 30: आता 5G युगात फडकेल भारताचा तिरंगा, ट्रान्समिशन व DTH मध्येही speed

GSAT 30: आता 5G युगात फडकेल भारताचा तिरंगा, ट्रान्समिशन व DTH मध्येही speed

 ज्या भागात अद्याप मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही तेथेही मोबाईल सेवा पोहोचेल

ज्या भागात अद्याप मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही तेथेही मोबाईल सेवा पोहोचेल

ज्या भागात अद्याप मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही तेथेही मोबाईल सेवा पोहोचेल

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 17 जानेवारी : इस्त्रोने जीसॅट-30 (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरुन यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या प्रक्षेपणामुळे इंटरनेटच्या युगात मोठी क्रांती होणार आहे. या उपग्रहामुळे टेलीविजन, दूरसंचार व प्रसारण सेवांमधील गुणवत्ता दुप्पटीने वाढणार आहे.  या उपग्रहाचा उपयोग डीटीएच टेलीविजन सेवा, डिजिटल सॅटेलाइट, टेलीविजन अपलिंकिंग, वीसॅट नेटवर्क या सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याबरोबरच हवामानाची माहिती मिळविण्यासाठी GSAT-30 अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. GSAT-30 उपग्रह 15 वर्षांपर्य़ंत पृथ्वीवरुन भारतातील सेवांसाठी काम करेल. यामुळे भारतातील Communication Service अधिक मजबूत होईल. यापूर्वी 2015 मध्ये इनसॅट- 4 हा उपग्रह लॉन्च करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आल्याने आज GSAT-30 या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. इंटरनेट तंत्रज्ञानात गतीने बदल होत आहे. यासाठी जास्त ताकदवर उपग्रहाची गरज आहे. यासाठी GSAT-30 चे प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे आता इनसॅट-4 ऐवजी GSAT-30 हा दूरसंचार उपग्रह काम करेल. या उपग्रहाचं वजन सुमारे 3,100 किलो आहे. प्रक्षेपणापासून पुढील १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे. याशिवाय हा उपग्रह जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित आहे. इंटरनेटच्या युगात नव क्रांती GSAT-30 या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे इंटरनेट तंत्रज्ञानात मोठी क्रांती होणार असून इंटरनेट सेवा सुपरफास्ट होणार आहे. याशिवाय ज्या भागात अद्याप मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही तेथेही ही सेवा पोहोचेल. या उपग्रहाचा उपयोग डीटीएच टेलीविजन सेवा, डिजिटल सॅटेलाइट, टेलीविजन अपलिंकिंग, वीसॅट नेटवर्क या क्षेत्रात करण्यात येणार आहे. 2020 मध्ये 10 उपग्रहांचे करणार प्रक्षेपण इस्त्रो सध्या एक किंवा दोन नाही तर तब्बल 10 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी काम करीत आहे. यामध्ये आदित्य-एल1 याचा समावेश आहे. हा उपग्रहाचे प्रक्षेपण 2020 मध्ये करता येऊ शकते. सुर्याचा अभ्यास करणारे हे पहिले भारतीय मिशन ठरणार आहे. इस्त्रोने गेल्या वर्षी ६ प्रक्षेपण आणि सात सॅटेलाइन मिशन लॉन्च केले होते.
First published:

पुढील बातम्या