गुडन्यूज! विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित, ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोतून झालं स्पष्ट

लँडर विक्रम सापडल्याचं इस्त्रोनं रविवारी सांगितलं होतं. आता ऑर्बिटरनं पाठवलेले फोटो पाहता विक्रम पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही हानी झाली नसल्याचं सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 02:22 PM IST

गुडन्यूज! विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित, ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोतून झालं स्पष्ट

बेंगळुरू, 09 सप्टेंबर : चांद्रयान 2 मोहिमेत फक्त 2 किमी अंतर राहिलं असताना लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. लँडर विक्रम सापडलं असल्याचं रविवारी इस्त्रोने स्पष्ट केलं होतं. आता इस्रोनं आणखी एक आनंदाची बातमी दिली असून विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती पीटीआयला दिली आहे.

चंद्रावर लँडर उतरवताना हार्ड लँडिंग झालं असण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोवरून लँडर पुर्णपणे सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. लँडरचे तुकडे होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झालेलं नसल्याचं इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विक्रमशी संपर्क साधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होता. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.

Loading...

SPECIAL REPORT: दापोलीचा मतदारसंघात शिवसेना मंत्र्याचा मुलगा मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2019 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...