10...9...8...आणि रॉकेट आकाशाला भेदून गेलं

10...9...8...आणि  रॉकेट आकाशाला भेदून गेलं

इस्रोनं एकाच वेळी 31 उपग्रह अवकाशात सोडले. आज सकाळी 9.20 मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एकूण 31 उपग्रह अवकाशात धाडले.

  • Share this:

23 जून : इस्रोनं एकाच वेळी 31 उपग्रह अवकाशात सोडले. आज सकाळी 9.20 मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एकूण 31 उपग्रह अवकाशात धाडले. सकाळी 9.20 मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली. नागरी तसंच लष्करी कामांकरता उपयोगी ठरणारा, जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे घेऊ शकणारा 712 किलो वजनाचा Catrosat 2 श्रेणीतील उपग्रह अवकाशात सुमारे 505 किमी उंचीवर प्रक्षेपित केला.

याबरोबर तामिळनाडूमधील नूरुल ( Noorul ) इस्लाम युनिव्हर्सिटीचा 15 किलो वजनाचा NIUSAT या नॅनो सॅटेलाईटही प्रक्षेपित केला.  तसंच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक रिपब्लिक, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, Latvia, लिथुआनिया, स्लोवाकिया, इंग्लंड आणि अमेरिका अशा एकूण 14 देशांतील विविध विद्यापीठ, वैज्ञानिक संस्था यांचे एकूण 29 नॅनो सॅटेलाईटस ( उपग्रह ) प्रक्षेपित केले.

इस्रोच्या अत्यंत भरवशाच्या PSLV या प्रक्षेपकाची ही 40 वी मोहीम असणार आहे. जर या मोहिमेत यश मिळाले तर PSLV प्रक्षेपकाचे हे सलग 38वं यश असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading