अंतराळ संशोधनात भारताचा ऐतिहासिक 'विक्रम', इस्रोची कामिगिरी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अंतराळ संशोधनात भारताचा ऐतिहासिक 'विक्रम', इस्रोची कामिगिरी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारतानं पाच वर्षांपूर्वी केलेल्या मंगळयान मोहिमेचं यश जगभरातील शास्त्रज्ञांना चकीत करणारं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला चांद्रयान-2 मोहिमेत पूर्ण यश मिळालं नाही. विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही ही मोहिम 95 टक्के यशस्वी झाल्याचं इस्रोनं म्हटलं आहे. दरम्यान, भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट ही आहे की अवघ्या 6 महिन्यांसाठी पाठवण्यात आलेलं मंगळयान गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली ही कामगिरी जगातील कोणत्याही देशाला करता आली नव्हती.

भारतानं 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान लाँच केलं होतं. त्यानंतर हे यान 11 महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. हे यान फक्त 6 महिन्यांसाटी मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात आलं होतं. मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)आतापर्यंत सुरू असून मंगळाची माहिती आजही इस्रोकडे पाठवत आहे.

मंगळयान मंगळाच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 ला पोहचलं होतं. याला 5 वर्ष झाली. आतापर्यंत मंगळयानाने 1 हजारपेक्षा जास्त फोटो पाठवले आहेत. या पाच वर्षात मंगळयानाकडून इस्रोच्या डाटा सेंटरला 5 टीबीपेक्षा जास्त डाटा मिळाला आहे. याचा उपयोग मंगळाच्या अभ्यासासाठी होत आहे. जगातील सर्वात कमी खर्चात हे मोहिम आखण्यात आली होती. यासाठी फक्त 450 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

सध्या मंगळयान मंगळाभोवती फिरत आहे. मंगळापासून किमान 421 किलोमीटर ते कलमा 76 हजार किलोमीटरवरून हे यान फेरी मारते. पाच वर्ष फेऱ्या मारल्यानंतरही त्याचे काम सुरू आहे. ही बाब जगभरातील शास्त्रज्ञांना चकीत करणारी आहे. अद्यापही यान सुस्थितीत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.

Loading...

मंगळ ग्रहावर असलेल्या ओलिंपिस मॉन्स नावाच्या ज्वालामुखीचा फोटो या यानाने घेतला होता. हा ज्वालामुखी आपल्या सौरमंडळात असलेल्या कोणत्याही पर्वतापेक्षा कितीतरी मोठा आहे. जगातील सर्वात उंच एवरेस्ट पेक्षा अडीचपट मोठ्या ज्वालामुखीची उंची 22 किमी आणि व्यास 600 किमी इतका आहे.

मॉमने पाठवलेल्या फोटोंवरून मंगळावर बर्फच बर्फ असल्याचं दिसतं. सातत्यानं बर्फवृष्टी कमी जास्त होत असते. चंद्राचा जास्तीजास्त 9 लाख 52 हजार 700 किमी ते किमान 6 लाख 33 हजार 825 किमी भाग बर्फाच्छादित असतो.

मंगळावर वेलेस मेरिनेरिसचे फोटोसुद्धा मॉमने घेतले आहेत. मंगळ ग्रहाच्या इक्वेटरजवळ हे खोरं आहे. याची लांबी 4000 किमी असून खोली काही ठिकाणी 7 किमीपेक्षा जास्त आहे.

VIDEO : माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Sep 25, 2019 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...