SPECIAL REPORT : इस्त्रोचं मोठं पाऊल, जगाला आपली दखल घेण्यासाठी लवकरच नवं मिशन!

अवकाशात झेंडा रोवणारी इस्त्रो आता समुद्रमंथन करणार आहे. पुढील तीन वर्षात खोल समुद्रात जाणारी सबमर्सिबल इस्त्रो तयार करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : अवकाशात झेंडा रोवणारी इस्त्रो आता समुद्रमंथन करणार आहे. पुढील तीन वर्षात खोल समुद्रात जाणारी सबमर्सिबल इस्त्रो तयार करणार आहे. डिप ओसियन मिशनसाठी दहा हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.

अवकाशात इस्त्रोनं रोवलेला झेंडा आणि गाठलेला पल्ला जगानं मान्य केला. इस्त्रोनं अवकाशात शेकडो उपग्रह पाठवले. अनेक मोहिमा राबल्या. चंद्र, मंगळ ग्रहांसह अवकाशात संशोधनाचं मोठं कार्य इस्त्रोकडून सुरू आहे. मात्र, आता अवकाश जिंकणारी इस्त्रो समुद्रमंथन करणार आहे. समुद्राचा तळ गाठण्यासाठी इस्त्रोचं काम सुरू झालंय. तीन वर्षात इस्त्रो समुद्राचा तळ गाठणार आहे.

समुद्राचा तळ आतापर्यंत कोणी पाहिला नाही, पण तिथं पोहोचण्यासाठीची सबमर्सिबल इस्त्रो तयार करणार आहे. तीन वर्षात ही सबमर्सिबल तयार होतेय. इस्त्रोनं सबमर्सिबलचं डिझाईन यशस्वीरित्या तयार केलंय. त्याच्या तांत्रिक कामालाही सुरूवात करण्यात आली. ही सबमर्सिबल तयार करण्यासाठी 8 सेंटीमीटर जाडीची टायटॅनिअम शीट वापरली जात आहे. डिप ओसियन मिशनसाठी इस्त्रो आणि एनआयओटीमध्ये करारही झाला.

इस्त्रो तयार करत असलेली सबमर्सिबल समुद्रात सुमारे 6 किलोमीटरपर्यंत जाऊ शकणार आहे. सबमरिन समुद्रात 200 मीटरपर्यंत जाऊ शकते. यावरून इस्त्रोची सबमर्सिबलची क्षमता किती जास्त आहे, हे लक्षात येतं. समद्रातल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. सबमर्सिबलमधून दोन वैज्ञानिक आणि एक ऑपरेटर प्रवास करू शकतील.

जगात फक्त पाचच देशांकडे अशाप्रकारच्या सबमर्सिबल आहेत. आता भारताच्या सबमर्सिबलमुळे ही संख्या सहा इतकी झाली. या सबमर्सिबलमुळे भारतीय वैज्ञानिक समुद्रातल्या जैवविविधतेमध्ये आमुलाग्र संशोधन करून नवनवे शोध लावतील हे नक्की. अर्थात हे सर्व शक्य होण्याचं श्रेय असणार आहे ते इस्त्रोलाच. इस्त्रोच्या कर्तृत्वाला सलाम.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading