भारताचा उपग्रह ठेवणार पाकिस्तानवर लक्ष, RISAT-2BR1ची झेप

भारताचा उपग्रह ठेवणार पाकिस्तानवर लक्ष, RISAT-2BR1ची झेप

सीमावर्ती भागात घुसखोरी रोखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष ठेवणं. त्यांच्या कारवायांच्या हालचाली टिपणं यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

  • Share this:

श्रीहरीकोटा 11 डिसेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे 50वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं विश्वसनीय प्रक्षेपक वाहन आहे. याच वाहनाने याआधी अनेक उपग्रह अवकाशात झेपावले होते. अवकाशातून पृथ्विवरचे फोटो घेण्याचं अचूक तंत्रज्ञान या उपग्रहामध्ये आहे. अतिशय स्पष्ट आणि उत्तम दर्जाचे फोटो या उपग्रहामधून घेतात येतात. त्यामुळे हेरगिरीसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

628 किलो वजनाचा हा उपग्रह RISAT-2B मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय लष्करासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. दुपारी 3.25 मिनिटांनी या उपग्रहाचं उड्डाण झालं. रिसॅट सोबतच इतर 9 देशांचे 10 उपग्रहही इस्रोने अवकाशात सोडले आहेत. या उपग्रहावर 0.35 मीटर रिझोल्यूशनचा कॅमेरा असून तो 35 सेंटीमीर असलेल्या दोन गोष्टींचा फोटो काढू शकतो.

सीमावर्ती भागात घुसखोरी रोखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष ठेवणं. त्यांच्या कारवायांच्या हालचाली टिपणं यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. याच श्रेणीतले आणखी काही उपग्रह पुढच्या काही महिन्यांमध्ये सोडण्यात येणार आहेत. लष्करी कारवाई दरम्यान एकाच ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराला किमान चार उपग्रहांची गरज असते. त्यामुळे याचा उपयोग होणार आहे.

मार्च महिन्यापर्यंत इस्रोच्या 13 मोहिमांचं नियोजन असून त्यात अनेक महत्त्वाचे उपग्रह सोडण्याचं नियोजन आहे. यात काही उपग्रह हे दुसऱ्या देशांचेही आहेत. त्यातून इस्रोला मोठा व्यावसायिक फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Dec 11, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या