भारताचं आठवं नेव्हिगेशन उपग्रह IRNSS-1H चं प्रक्षेपण अयशस्वी

खाजगी क्षेत्रातील पहिला उपग्रह आयआरएनसएस 1 एचचं प्रक्षेपण अपयशी ठरलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2017 09:13 PM IST

भारताचं आठवं नेव्हिगेशन उपग्रह IRNSS-1H चं प्रक्षेपण अयशस्वी

31 आॅक्टोबर : खाजगी क्षेत्रातील पहिला उपग्रह आयआरएनसएस 1 एचचं प्रक्षेपण अपयशी ठरलंय. इस्त्रोचे चेअरमन ए.एस किरण कुमार यांनी याबद्दल दुजोरा दिलाय.

भारतीय संशोधन संस्था इस्रोकडून संपूर्ण भारतीय बनावटीच्या आयआरएनसएस ( Indian regional navigation satellite system) 1एच या उपग्रहाचं आज संध्याकाळी  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्चिंग सेंटरहून लाँच करण्यात आलंय.

एकूण 44.4 मिटर लांब पीएसएलव्ही-सी 39 ची ही 41 वी उड्डाण होती. आपल्यासोबत 1,425 किलो वजनी उपग्रह घेऊन जात होता. तसंच अल्फा डिजाईन डिफेन्स  इक्विपमेंट सप्लायर बंगळूर या संस्थेकडून  इस्रोच्या मार्गदर्शनाखाली  या उपग्रहाची निर्मिती  झाली होती.

 

Loading...

अंतराळात यापूर्वी  आयआरएनसएसच्या साखळीतील सात उपग्रहांचं प्रक्षेपण झालेलं आहे. यातील एक आईआरएनएसएस-1ए साठी आईआरएनएसएस-1एच हा उपग्रह त्याला बॅकअप देणार होता. पण अचानक या उपग्रहात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते फेल गेलं.

भारतीय संशोधन संस्था इस्रो कडून संपूर्ण भारतीय बनावटीच्या IRNSS ( Indian regional navigation satellite system) 1H या उपग्रहाच प्रक्षेपण  यशस्वी ठरले असते तर  दळणवळण क्षेत्रातील महत्वाचा  भाग यामुळे पूर्ण होणार होता. विशेषतः  यापूर्वी जीपीएस सिस्टीमसाठी ,नौदल, हवाई दलात दिशा दर्शकात अमेरिकन जीपीएस चां वापर केला जात होता, यात कोट्यावधी डॉलर मोजावे लागत होते. मात्र १H च्या प्रक्षेपणनाने दळणवळण क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण झाला असता.

इस्त्रोने यापूर्वी सात उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. यात

आईआरएनएसएस-1जी प्रक्षेपण 28 एप्रिल 2016

आईआरएनएसएस-1एफ प्रक्षेपण 10 मार्च 2016

आईआरएनएसएस-1ई  प्रक्षेपण 20 जानेवरी 2016

आईआरएनएसएस-1डी प्रक्षेपण 28 मार्च 2015

आईआरएनएसएस-1सी प्रक्षेपण 16 आॅक्टोबर 2014

आईआरएनएसएस-1बी प्रक्षेपण 4 एप्रिल 2014

आईआरएनएसएस-1ए प्रक्षेपण 1 जुलै 2013

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...