अंतराळ क्षेत्रात भारतानं रचला इतिहास, आर्यभट्ट ते कार्टोसॅट-२, उपग्रहांचं शतक पूर्ण

भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो आज एकाचवेळी ३१ उपग्रह काही वेळातच अवकाशात सोडणार आहे. त्याचबरोबर भारत आज अंतराळात उपग्रहांचं शतकदेखील पूर्ण करणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2018 10:55 AM IST

अंतराळ क्षेत्रात भारतानं रचला इतिहास, आर्यभट्ट ते कार्टोसॅट-२, उपग्रहांचं शतक पूर्ण

12 जानेवारी : अंतराळ क्षेत्रात भारताने इतिहास रचत आज उपग्रहांचे शतक पूर्ण केलं. आर्यभट्ट ते कार्टोसॅट-२ असे १०० उपग्रह इस्रोने अवकाशात सोडलेत. सकाळी ९.२९ मिनटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४० राॅकेटमधून ३१ उपग्रह अवकाशात त्यांच्या निर्धारित कक्षेत यशश्वीपणे  सोडण्यात आलेत.

भारताचा कार्टोसॅट-२ हा १०० वा उपग्रह अंतराळात स्थिरावलाय. याशिवाय आंतराष्ट्रीय अंतराळ व्यापारात मोठी झेप घेत इस्रोने इतर सहा देशांचे २८ उपग्रह अवकाशात सोडलेत. पीएसएलव्ही-सी ४० या राॅकेटचं हे ४२वं उड्डाण होतं. विदेशी अंतराळ संस्थांनी भारतीय शास्त्रज्ञांवर दाखवलेला विश्वास त्यांनी यशस्वी करून दाखवलांय. भारताच्या शतकी उपग्रहामुळे, आता जगभरात भारताने आपला दबदबा निर्माण केलांय. त्यामुळे भारताला सुपरपॉवर बनण्यासाठी इस्रो सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

काय आहे PSLV-C40 मोहीमेचं वैशिष्ट्य?

१) एकुण ३१ उपग्रह

२) भारताचा शंभरावा कार्टोसॅट-२ उपग्रह, वजन ७१०

Loading...

३) भारताचा एक मायक्रो तर एक नॅनो उपग्रह

४) ६ देशांचे २८ उपग्रह

५) त्यापैकी ३ मायक्रो तर २५ नॅनो उपग्रह

६) कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, रिपब्लिक कोरिया, इंग्लँड, अमेरीका या ६ देशांचा समावेश

७) सर्व ३१ उपग्रहांचे वजन १३२३ किलोग्रॅम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...