'इस्रो'ची आणखी एक गगन भरारी; एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

'इस्रो'ची आणखी एक गगन भरारी; एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने आणखी एक गगन भरारी घेतली आहे.

  • Share this:

चेन्नई, 1 एप्रिल: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने आणखी एक गगन भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात झेपावले. आज पाठवलेल्या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे आहेत. 'इस्रो'ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे.'इस्रो'ने सोमवारी एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची कामगिरी केली. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपक एमीसॅट व 28 नॅनो उपग्रहांना घेऊन अवकाशात झेपावले. पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान 2008 व मंगळ ऑर्बिटर 2013 या दोन्ही मोहिमांत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आज पाठवण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11 ,स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

मिळणार शत्रूच्या रडाराची माहिती

एमीसॅटमुळे संरक्षण विषयक मोठी माहिती देशाला मिळणार आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. या उपग्रहामुळे देशातील गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी सुद्धा या उपग्रहाच्या माध्यमातून फोटो काढता येतील. तसेच शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना या उपग्रहामुळे कळणार आहे.VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 10:21 AM IST

ताज्या बातम्या