ISROची अभिमानास्पद कामगिरी, रिसेट-2बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISROची अभिमानास्पद कामगिरी, रिसेट-2बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा, 22 मे: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. बुधवारी पहाटे इस्रोने Risat- 2BR1 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे पीएसएलव्ही-सी60च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते होते कारण रिसेट उपग्रह मालिकेतील हा चौथा उपग्रह होता. या उपग्रहामुळे शत्रूवर नजर ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीवेळी माहिती जमा करता येणे शक्य होणार आहे.

1 मीटर लांबून काढता येईल फोटो

Risat- 2BR1मधील बँन्ड सायनोथिक अपर्चर रडार (SAR)मुळे या उपग्रहाच्या माध्यमातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्री देखील स्पष्ट फोटो काढता येतील. इतक नव्हे तर कोणत्याही ऋतूमध्ये अगदी स्पष्ट फोटो काढण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. SAR रडारामुळे कोणत्याही हवामानात कोणत्याही वस्तूचा स्पष्ट फोटो घेता येतो. इतक नव्हे तर दोन वस्तू १ मीटर अंतरावर असतील तर दोन्हीची ओळख हा उपग्रह करून घेतो.

जमीनीवरील कोणत्याही इमारतीचा अथवा वस्तूचा दिवसभरात 2 ते 3 वेळा फोटो SAR रडार घेऊ शकते. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय LOCवर होणाऱ्या घुसखोरीवर नजर ठेवता येणार आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवता येईल. Risat- 2BR1 उपग्रह समुद्रात शत्रू देशाचे जहाज देखील शोधून काढू शकते. या उपग्रहाच्या माध्यमातून हिंदी महासागरात चीन आणि अरबी समुद्रात पाकिस्तानच्या जहाजांवर लक्ष ठेवता येईल.

सर्जिकल स्ट्राईकसाठी मिळणार मदत

2016मधील सर्जिकल स्ट्रईकसाठी Risat मालिकेतील याआधीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्टाईकसाठी देखील Risatची मदत घेण्यात आली होती. इतक नव्हे तर या उपग्रहाने अनेक नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर भारताने Risat-1 आणि Risat-2 या मोहिमांवर जोर दिला होता. या उपग्रहात वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक रडारमुळे मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारख्या घटना रोखता येणे शक्य होऊ शकते. इस्रायलमध्ये निर्मिती झालेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण 20 एप्रिल 2009 रोजी करण्यात आले होते. Risatचा मुख्य उद्देश सुरक्षा दलाची क्षमता वाढवण्याचा होता. Risatचा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेहमीच वापर केला आहे. यामुळे घुसखोरीच्या अनेक घटना रोखण्यात यश देखील आले आहे.

First published: May 22, 2019, 7:03 AM IST
Tags: isro

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading