News18 Lokmat

ISRO अंतराळात पाठवणार SPY उपग्रह, पाकच्या कुरापतींना बसणार लगाम!

येत्या 22 मे रोजी इस्रोकडून भारतीय लष्कराला एक भेट मिळणार आहे. या भेटीचा वापर भारतीय जवान देशाच्या सीमांचे रक्षणासाठी करू शकणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 03:11 PM IST

ISRO अंतराळात पाठवणार SPY उपग्रह, पाकच्या कुरापतींना बसणार लगाम!

श्रीहरीकोटा, 06 मे: येत्या 22 मे रोजी इस्रोकडून भारतीय लष्कराला एक भेट मिळणार आहे. या भेटीचा वापर भारतीय जवान देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी करू शकणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो 22 तारखेला Risat- 2BR1 या उपग्रहाचे आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करणार आहे. Risat- 2BR1मुळे भारतीय जवानांना कोणत्याही वातावरणात अधिक सक्षमपणे सीमांचे रक्षण करू शकतील.

अंतराळ क्षेत्रात आणखी एक भरारी घेण्यास इस्रो सज्ज झाले आहे. 22 मे रोजी Risat- 2BR1 उपग्रहाच्या प्रक्षेपणासह भारताचे अंतराळातील ताकद आणखी वाढणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने भारत पृथ्वीच्या कोणत्याही ठिकाणाचे, इमारतीचे किंवा वस्तूचे दिवसभरात 2 ते 3 वेळा फोटो काढू शकेल. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Risat- 2BR1 उपग्रह आधीच्या Risat पेक्षा अधिक अत्याधुनिक आहे. Risat- 2BR1मध्ये देखरेख आणि फोटो घेण्याची क्षमता ही अधिक चांगली करण्यात आली आहे.

1 मीटर लांबून काढता येईल फोटो

Risat- 2BR1मधील बँन्ड सायनोथिक अपर्चर रडार (SAR)मुळे या उपग्रहाच्या माध्यमातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्री देखील स्पष्ट फोटो काढता येतील. इतक नव्हे तर कोणत्याही ऋतूमध्ये अगदी स्पष्ट फोटो काढण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे. SAR रडारामुळे कोणत्याही हवामानात कोणत्याही वस्तूचा स्पष्ट फोटो घेता येतो. इतक नव्हे तर दोन वस्तू १ मीटर अंतरावर असतील तर दोन्हीची ओळख हा उपग्रह करून घेतो.

जमीनीवरील कोणत्याही इमारतीचा अथवा वस्तूचा दिवसभरात 2 ते 3 वेळा फोटो SAR रडार घेऊ शकते. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय LOCवर होणाऱ्या घुसखोरीवर नजर ठेवता येणार आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवता येईल. Risat- 2BR1 उपग्रह समुद्रात शत्रू देशाचे जहाज देखील शोधून काढू शकते. या उपग्रहाच्या माध्यमातून हिंदी महासागरात चीन आणि अरबी समुद्रात पाकिस्तानच्या जहाजांवर लक्ष ठेवता येईल.

Loading...

सर्जिकल स्ट्राईकसाठी मिळणार मदत

2016मधील सर्जिकल स्ट्रईकसाठी Risat मालिकेतील याआधीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्टाईकसाठी देखील Risatची मदत घेण्यात आली होती. इतक नव्हे तर या उपग्रहाने अनेक नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर भारताने Risat-1 आणि Risat-2 या मोहिमांवर जोर दिला होता. या उपग्रहात वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक रडारमुळे मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारख्या घटना रोखता येणे शक्य होऊ शकते. इस्रायलमध्ये निर्मिती झालेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण 20 एप्रिल 2009 रोजी करण्यात आले होते. Risatचा मुख्य उद्देश सुरक्षा दलाची क्षमता वाढवण्याचा होता. Risatचा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेहमीच वापर केला आहे. यामुळे घुसखोरीच्या अनेक घटना रोखण्यात यश देखील आले आहे.


VIDEO : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याची बोटंच तुटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: isro
First Published: May 6, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...