इस्रोनं सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

इस्रोनं सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

  • Share this:

29 मे : इस्रोने पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी सुरू केलीये. ही चाचणी यशस्वी झाल्यास  भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवणं शक्य होईल. असा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेनं म्हणजेच इस्रोनं तयार केलेला अंदाज आहे.

आजवरच्या सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणासाठी सज्ज होत आहे. पूर्ण वाढ झालेल्या २०० आशियाई हत्तींएवढे किंवा प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या जंबो जेट विमानाहून पाचपट म्हणजे ६४० टन एवढे वजन असलेले जिओरिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिएकल मार्क-३  अशा नावाचा हा अग्निबाण सतीश धवन अंतराळ तळाच्या लॉन्च पॅडवर आणून उभा करण्यात आला आहे..

मान्सूनपूर्वीच्या असह्य उन्हाळ्यातही इस्रोचे अभियंते पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहेत. इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले की, या अग्निबाणाचे लवकरच पहिलं चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. अशी किमान सहा चाचणी उड्डाणं यशस्वी झाली तर पुढील दशकभरात हाच अग्निबाण वापरून भारतीय अग्निबाण वापरून भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात धाडणंही शक्य होऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 11:23 AM IST

ताज्या बातम्या