लँडर 'विक्रम'च्या संपर्कासाठी आता राहिले फक्त 7 दिवस, इस्रोने आशा सोडली नाही!

विक्रम कोसळलेल्या ठिकाणी सध्या सूर्यप्रकाश आहे. आणखी सात दिवसांनंतर तिथे अंधार होणार असून कडाक्याची थंडी असणार आहे. त्यामुळे सर्व प्रयत्न राहिलेल्या या सात दिवसांमध्येच करावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 10:10 PM IST

लँडर 'विक्रम'च्या संपर्कासाठी आता राहिले फक्त 7 दिवस, इस्रोने आशा सोडली नाही!

बंगळुरू 13 सप्टेंबर : लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचे इस्रोचे अतिशय जोमाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक क्षण इस्रोसाठी महत्त्वाचा असून सर्व शक्ती आणि बुद्धी वापरून विक्रमशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जसा वेळ जाईल तशी शक्यता कमी कमी होत जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 7 सप्टेबरला विक्रमशी संपर्क तुटला आणि 8 तारखेला विक्रम छडा लागला. त्याचं चंद्रावर हार्ड लँडींग झालं असं ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमधून स्पष्ट झालं. विक्रमचे चंद्रावर कामाचे फक्त 14 दिवस होते. त्यात 7 दिवस गेल्याने आता फक्त सात दिवस राहिले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात येतील असंही इस्रोच्या सूत्रांनी सांगितलंय.

पृथ्विवरचे 14 दिवस म्हणजे चंद्राचा 1 दिवस असतो. विक्रम कोसळलेल्या ठिकाणी सध्या सूर्यप्रकाश आहे. आणखी सात दिवसांनंतर तिथे अंधार होणार असून कडाक्याची थंडी असणार आहे. त्यामुळे सर्व प्रयत्न राहिलेल्या या सात दिवसांमध्येच करावे लागणार आहे. विक्रममध्ये असलेली बॅटरीही ड्राय होत असून जेवढा वेळ जाईल तेवढी ती बॅटरी डिस्चार्ज होणार आहे. त्यामुळे शास्रज्ञांची भीती वाढली आहे.

आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

NASAच्या ऑर्बिटरने शोधले पावलांचे ठसे

भारताचा चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्त्रोकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आता अमेरिकनं अंतराळ संस्था नासाची मदत यासाठी घेण्यात येणार आहे. नासाच्या ऑर्बिटरने याआधी अत्यंत सूक्ष्म अशा बाबी टिपल्या आहेत. त्याच्या आधारे विक्रम लँडरबद्दलची माहिती घेऊन त्याच्यावर पुढं काय करायचं हे इस्त्रो ठरवणार आहे.

Loading...

चांद्रयान 2: 'विक्रम'शी संपर्क करण्याची अखेरची होप; X-Band कमाल करणार का?

नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत भारताच्या ऑर्बिटरपेक्षा जास्त जवळून फेरी मारतो. त्याने टिपलेल्या फोटोंमधून भारताच्या विक्रम लँडरचा तपशील मिळेल. नासाने 2009 मध्ये चांद्र मोहिम केली होती. त्यात अॅटलस व्ही रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या ऑर्बिटरनं चंद्रावरील खनिज, साधनसंपत्ती यांची ठिकाणं भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमा आखण्यासाठी कोणती जागा योग्य याची माहिती घेतली. जवळपास एक वर्ष त्याची मोहिम सुरू होती.

मोबाईल हरवला आता चिंता नको! सरकार शोधणार तुमचा फोन

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर दोन दिवसांनी एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यात विक्रम चंद्रावर उतरल्याचं म्हटलं जात होतं. पण तो फोटो नासाच्या ऑर्बिटरने काढलेला होता. यात 40 वर्षांपूर्वी अपोलो मिशन ज्या जागी झाली तिथला फोटो होता. त्यात चंद्रावरच्या मानवाच्या पावलांचे ठसेही दिसत होते. नासानेच हा फोटो शेअऱ केला होता. पावलांचे ठसे टिपणाऱ्या या ऑर्बिटरची मदत आता विक्रम लँडरची माहिती व्हावी यासाठी घेण्यात येणार आहे.

17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जिथं विक्रम लँडर आहे तिथून जाणार आहे. त्याचे फोटो ऑर्बिटर घेऊन इस्त्रोला पाठवणार आहे. तेव्हा विक्रमची नेमकी स्थिती काय याची माहिती होणार आहे. नासा त्यांचे सर्व फोटो आणि माहिती संकेत स्थळावर अपडेट करते. विक्रमचे फोटो काढल्यानंतर तेसुद्धा इस्त्रोला पाठवले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Sep 13, 2019 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...