मराठी बातम्या /बातम्या /देश /

इस्रोचं EOS-03 सॅटेलाईट लॉन्च फेल; तांत्रिक अडचणींमुळे अपयशी ठरलं मिशन

इस्रोचं EOS-03 सॅटेलाईट लॉन्च फेल; तांत्रिक अडचणींमुळे अपयशी ठरलं मिशन

क्रायोजेनिक स्टेजमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे इस्रोचं GSLV-F10/EOS-03 मिशन पूर्ण होऊ शकलं नाही (GSLV-F10 EOS-03 Launching Failed). इस्त्रोनं या गोष्टीची माहिती दिली आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO) सकाळी 5.43 वाजता EOS-3 उपग्रहाचे यशस्वी लॉन्चिंग केले. मात्र, लॉन्चिंगनंतर काही वेळातच इस्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले, की क्रायोजेनिक स्टेजमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोचं GSLV-F10/EOS-03 मिशन पूर्ण होऊ शकलं नाही (GSLV-F10 EOS-03 Launching Failed). इस्रोनं या गोष्टीची माहिती दिली आहे, की तांत्रिक अडचणींमुळे EOS-3 उपग्रहाचे लॉन्चिंग फेल झालं आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे, की 2017 नंतर एखाद्या भारतीय लॉन्चमध्ये आलेलं हे पहिलं अपयश आहे.

Covaxin घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी; लशीबाबत WHO घेणार 'हा' महत्त्वाचा निर्णय

ISRO नं सांगितलं, की सॅटेलाईचा संपूर्ण यशस्वी वेळ 18.39 मिनिटं इतका होता, मात्र शेवटच्या वेळी क्रायोनिक स्टेजमध्ये तांत्रिक अडचण आली. यामुळे इस्त्रोला आकडे मिळणं बंद झालं. इस्त्रो चीफनं माहिती देत सांगितलं, की EOS-3 मिशन फेल झालं आहे.

जीसॅट-1 या आधुनिक इमेजिंग सॅटेलाइटमध्ये हाय रिझॉल्युशन कॅमेरा (High Resolution Camera) बसवण्यात आला होता. तो भारतीय भूक्षेत्र आणि सागरी क्षेत्रावर सातत्याने नजर ठेवणार होता. सीमासुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं मानलं जातं होतं. एखाद्या नैसर्गिक आपत्तीपूर्वीच तिचं अनुमान बांधणं या उपग्रहाच्या मदतीने शक्य होणार होतं. मात्र, हे मिशन अपयशी ठरल्यानं भारताला मोठा धक्का बसला आहे.

दोन टनपेक्षा जास्त वजन असलेल्या या उपग्रहासाठी इस्रोने पहिल्यांदाच कमानीसारख्या आकाराच्या कवचाचा वापर केला होता. एखाद्या गोळीसारखा त्याचा आकार होता आणि तो पुढून टोकदार होता. जीएसएलव्ही-एफ10 या रॉकेटच्या माध्यमातून हा उपग्रह जिओसिंक्रोनस स्थानांतरण कक्षेपर्यंत पोहोचवला जाऊन तिथून ऑनबोर्ड प्रॉपल्शन सिस्टीमचा वापर करून हा उपग्रह जिओस्टेशनरी कक्षेपर्यंत पोहोचवण्यात येणार होता. ती कक्षा पृथ्वीपासून सुमारे 36 हजार किलोमीटर उंचीवर आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन अपयशी ठरलं.

First published:

Tags: Isro