खूशखबर! संपर्क तुटलेला 'विक्रम' सापडला, इस्त्रोच्या प्रमुखांनी दिली माहिती

चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. आता त्याचे फोटो चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरनं काढले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 02:02 PM IST

खूशखबर! संपर्क तुटलेला 'विक्रम' सापडला, इस्त्रोच्या प्रमुखांनी दिली माहिती

बेंगळुरू, 08 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो काढले असून विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होता. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो काढले आणि ते इस्त्रोला पाठवले तर संपर्क तुटण्याचं खरं कारण समजू शकेल.

Loading...

VIDEO: गडचिरोली पाण्याखाली; काळजात धडकी भरवणारी पुराची विदारक दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...