ISROचं कमबॅक, पुन्हा करणार चंद्रावर स्वारी!

'इस्रो आदित्‍य L1 आणि अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याच्या मोहिमेवरही काम करत असून त्या माहिमाही फत्ते होणार आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 06:04 PM IST

ISROचं कमबॅक, पुन्हा करणार चंद्रावर स्वारी!

नवी दिल्ली 2 नोव्हेंबर : चंद्रावर मानवरहीत यान उतरविण्याची भारताची संधी काही महिन्यांपूर्वी थोडक्यात हुकली होती. Chandrayaan 2चा चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरवर असतानाच संपर्क तुटला होता. त्यामुळे ISROची महत्त्वाकांक्षी Chandrayaan 2 मोहिम पूर्ण यशस्वी होऊ शकली नव्हती. मात्र ISROने आशा सोडलेली नाही. ISRO चंद्रावर सॉफ्ट लँडींगचा पुन्हा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास इस्रोचे प्रमुख के सिवन (K Sivan) यांनी म्हटलं आहे. दिल्ली IITच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यानापासून वेगळं झाल्यानंतर Vikram Lander चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त काही अंतरावर असतानाच ते कोसळल्याचं नंतर स्पष्ट झालं. इस्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होताहेत त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमामध्ये सिवन  बोलत होते. ते म्हणाले, चांद्रयान-2 मोहिमेशी सगळ्यांच्या आशा-आकांक्षा जोडल्या होत्या.

KBC मध्ये राहुल गांधींवर प्रश्न, स्पर्धकाच्या उत्तरावर BJP खासदाराने घेतली फिरकी

त्या अपेक्षांना इस्रो कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. देशावासियांच्या त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होणार असून त्यावर इस्रो काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरलं असतं तर असं करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला असता. पण आत्तापर्यंत भारताकडे अतिशय महत्त्वाचा डाटा मिळाला असून तो पुढच्या संशोधनासाठी उपयोगी ठरणार आहे.

लग्नाच्या मंडप तुफान राडा, फुलांच्या अक्षतांऐवजी लाथाबुक्क्यांचा मार, पाहा VIDEO

इस्रो येत्या काही महिन्यांमध्ये एक प्रगत उपग्रह सोडणार आहे. त्याच बरोबर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात स्‍मॉल सॅटेलाइट लॉन्‍च व्‍हेइकलही (SSLV)  उड्डाण करणार आहे. भारताने NAVIC सॅटेलाईटच्या मदतीने मोबाईलवर संदेश पाठविण्यासाठी प्रयत्न करत असून त्यात लवकरच यश येईल असंही ते म्हणाले. इस्रो आदित्‍य L1 आणि अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याच्या मोहिमेवरही इस्रो काम करत असून त्यातही यश येईल असंही ते म्हणाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...