चांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास

चांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : अंतराळात भारताने आज नवा इतिहास निर्माण केला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 यशस्वीपणे आकाशात झेपावले. GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2ने उड्डाण केलं. GSLV मार्क III-M1 हे भारताचं सर्वात मोठं प्रक्षेपक यान आहे. रविवारी  संध्याकाळी 6.43 वाजल्यापासून काउंटडाऊनदेखील सुरू झालं होतं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रावरून या यानाने उड्डाण केलं. यानाची गती आणि दिशा योग्य असल्याची माहिती ISROने दिली आहे.

24 तासांमध्ये दुरुस्त केला बिघाड

बिघाड झाल्यानंतर इस्रोच्या इंजिनिअर्सनी अवघ्या 24 तासात तांत्रिक बिघाड शोधून काढून तो दुरुस्त केला. त्यानंतर काही दिवस त्याची चाचणी घेतली गेली आणि नंतर यान उड्डाणासाठी सज्ज केलं गेलं. शास्त्रज्ञांनी दिवस रात्र जी कठोर मेहेनत घेतली त्या मेहेनतीचं हे फळ असल्याची प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केली.

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

गेल्या आठ दिवसांमध्ये ISROच्या शास्त्रज्ञांनी दिवस रात्र मेहनत करून झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त केला आणि अतिशय कमी वेळात यानाला उड्डाणासाठी सज्ज केलं. ISRO ने या मोहिमेत काही बदल केले असून यानाचा प्रवास 6 दिवसांनी कमी केलाय.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल.

तांत्रिक बिघाडामुळे प्रेक्षपण पुढे ढकललं होतं.

चांद्रयान 2 चं प्रक्षेपण सोमवारी (15 जुलै )काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात आलं. ठरलेल्या वेळेनुसार चांद्रयान -2 ही मोहीम पहाटे 2 वाजून 51 मिनिटाला झेपवणार होती. यासाठी काउंटडाऊनही सुरू झालं होतं. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला 56 मिनिटं 24 सेकंद उरले असताना काही तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्त्रोच्या वतीनं करण्यात आली.

ISROने जाहीर केली चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर!

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या