श्रीहरीकोटा, 15 जुलै: चांद्रयान-2 (Chandrayaan-2 )मधील तांत्रिक दोष समोर आला नसता तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात isroने गेल्या 11 वर्षापासून पाहिलेले स्वप्न एका क्षणात भंगलं असते. प्रक्षेपणाच्या काही मिनिटे आधी तांत्रिक दोष समोर आल्यामुळे चांद्रयान-2 मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या या मोहीमेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे इस्रोने सांगितले आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून जीएसएलव्ही मार्क 3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार होते. पण प्रक्षेपण होण्याच्या 56 मिनिटे आणि 24 सेकंद आधी मोहीम थांबवण्यात आली. जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये इंधन भरत असताना तांत्रिक चूक आढळली आणि हा निर्णय घेण्यात आला. चांद्रयान-2चे प्रक्षेपण थांबवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. संपूर्ण मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात इतकी मोठी तांत्रिक दोष असल्यामुळेच मोहीम पुढे ढकलण्यात आली. जर या दोषाकडे दु्र्लक्ष केले असते तर संपूर्ण मोहीमच फसली असती आणि 11 वर्षापासून भारतीय शास्त्रज्ञांनी पाहिलेले स्वप्न व 960 कोटी रुपये पाण्यात गेले असते.
Chandrayaan2 चं आजचं प्रक्षेपण रद्द, शास्त्रज्ञांनी शेवटच्या क्षणी घेतला निर्णय
जीएसएलव्ही मार्क 3 इंधन भरत असताना हा दोष समोर आला नसता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. भारताची महत्वाकांक्षी मोहीम अपयशी ठरली असती. चंद्राच्या ज्या भागावर आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही तेथे भारताचे चांद्रयान-2 जाणार होते. या मोहिमेत चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर उतरवला जाणार होता.
VIDEO: चांद्रयान-2 का झेपावलं नाही, पाहा खरं कारण!