Chandrayaan-2: ISRO चंद्राच्या अगदी जवळ; 'लँडर विक्रम' चंद्र भूमीकडे रवाना!

Chandrayaan-2: ISRO चंद्राच्या अगदी जवळ; 'लँडर विक्रम' चंद्र भूमीकडे रवाना!

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वी पार पाडला.

  • Share this:

श्रीहरीकोटा, 02 सप्टेंबर: भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वी पार पाडला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)अर्थात इस्रोच्या चांद्रयान 2 (Chandrayaan-2) ने चंद्रा(Moon)च्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर चांद्रयान 2मधील ऑर्बिटरमधून लँडर विक्रम वेगळा झाला आणि तो चंद्राच्या आणखी जवळ पोहोचला. दुपारी 12 वाजून 45 मिनिटापासून ते 1 वाजून 45 मिनिटापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.

ISROने दिलेल्या माहितीनुसार 1.15 मिनिटांनी लँडर विक्रम (Lander Vikram) चांद्रयान 2पासून वेगळा झाला. आता 7 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता विक्रम चंद्राच्या भूमीवर उतरेल. चांद्रयान 2ने चंद्राच्या कक्षेत 20 ऑगस्ट रोजी प्रवेश केला होता. लँडर विक्रम दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ऑर्बिटरपासून यशस्वीपणे वेगळा झाला. विक्रम लँडरची सध्याची स्थिती 119 किमी X 127 किमी कक्षेत आहे. चांद्रयान 2 ऑर्बिटर त्याच्या सध्याच्या कक्षेत चंद्राची फेरी मारत राहील.

7 तारखेला होणार लँडिंग

दोन सप्टेंबर रोजी लँडर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळा झाल्यानंतर आता 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. ही सर्व प्रक्रिया यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरेल. आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला पोहोचता आले नाही. भारताच्या आधी रशिया, अमेरिका आणि चीन चंद्रावर पोहोचले आहेत. पण त्यांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाता आले नाही. लँडर चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल आणि 6 चाकाच्या मदतीने चंद्राच्या भूमीवर वैज्ञानिक प्रयोग करेल.

कोणालाच पोहोचता आले नाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

चांद्रयान 2 मोहीमचे यश भारतासाठी गौरशाली क्षण ठरणार आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कोणालाही जाता आले नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्यास चंद्राची अनेक रहस्ये उलघडण्यास मदत होणार आहे. या नव्या संशोधनामुळे भारतासह संपूर्ण जगाला फायदा होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी दोन वेळा मार्ग बदलला जाईल. बेंगळूरू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्कच्या अँन्टिनाच्या मदतीने या मोहिमेवर नियंत्रण ठेवले जात आहे. चांद्रयान 2 चा पुढील कक्षा बदल बुधवारी 12.30 ते 1.30 दरम्यान होणार आहे.

दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण...

ISROचे चांद्रयान-2 चंद्राच्या ज्या भागावर उतरणार आहे त्याला डार्क साइड असे म्हणतात. या डार्क साईडबद्दल जगाला फार माहिती नाही. भारताच्या आधी चंद्राच्या भूमीवर पोहोचलेले अमेरिका, रशिया आणि चीन यांना दाखील या डार्क साइडवर पोहोचता आले नाही. भारताच्या चांद्रयान-1मध्ये दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याचे आढळले होते. त्यामुळेच आता चांद्रयान-2च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दलची अधिकची माहिती मिळवली जाणार आहे. चंद्रायान-2च्या माध्यमातून चंद्राच्या भौगोलिक वातावरणाचा, तेथील खनिजे, वातावरण आणि पाण्याची उपलब्धता याची माहिती मिळवली जाणार आहे. चांद्रयान-2च्या माध्यमातून भारताने अन्य देशांच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की, भारत आतापर्यंत कोणीही पोहोचले नाही अशा ठिकाणी जात आहे.

दक्षिण ध्रुवावर असे आहे तरी काय?

चंद्राचा दक्षिण ध्रुव हा खास असा आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चंद्राचा उत्तर ध्रुव हा अधिक काळ प्रकाशात असतो. दक्षिण ध्रुवावर पाणी होण्याची शक्यता याआधी देखील व्यक्त करण्यात आली होती. चंद्राच्या या डार्क साइड भागात बर्फाच्या स्वरुपात विश्वनिर्मितीच्या वेळी लुप्त झालेल्या जीवाश्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ चंद्राच्या निर्मिती संदर्भात नाही तर पृथ्वीच्या निर्मिती संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर काय?

ISROचे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर भारत आतापर्यंत न मिळालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार आहे. दक्षिण ध्रुवावर अशी खनिजे मिळू शकतात ज्यामुळे मानवाच्या पुढील 500 वर्षातील गरजांची पूर्ततात होऊ शकते. या खनिजांच्या विक्रीतून लाखो डॉलरची कमाई देखील होऊ शकते. चंद्रावरून मिळणारी ही ऊर्जा केवळ सुरक्षित असणार नाही तर ती प्रदूषण मुक्त देखील असेल.

चंद्रावरच इतका फोकस का?

स्टीफन हॉकिंग यांनी सांगितल्या प्रमाणे, आपण जर अंतराळात गेले नाही तर आपल्याला भविष्यच असणार नाही. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला चंद्रच आपल्याला लांब पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांमध्ये मदतीला येणार आहे. भविष्यातील मोठ्या मोहिमा आणि त्यासाठी तांत्रिक मदत आणि आवश्यक परिक्षण चंद्रावर करणे शक्य होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळेच चंद्रावर सर्वांचे लक्ष आहे.

पृथ्वीवर चालण्यासाठी घालावा लागला चक्क स्पेस सुट, VIDEO VIRAL

Published by: Akshay Shitole
First published: September 2, 2019, 3:29 PM IST
Tags: isromoon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading