रस्त्यावर कचरा टाकून वंदे मातरम म्हणणं योग्य आहे का?-पंतप्रधानांचा सवाल

रस्त्यावर कचरा टाकून वंदे मातरम म्हणणं योग्य आहे का?-पंतप्रधानांचा सवाल

तसंच रोझ डेप्रमाणेच पंजाबातल्या मुलांनी केरळ डे ,विविध राज्यातील मुलांनी वेगवेगळ्या राज्यांचे डे साजरे करावे असंही मोदी यावेळी म्हणाले

  • Share this:

दिल्ली,11 सप्टेंबर:  देशात अस्वच्छता करणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा हक्क नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. आज  विज्ञान भवनमध्ये विद्यार्थी संमेलनात  पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते . हे भाषण प्रत्येक विद्यापीठात लाईव्ह दाखवायचे निर्देश युजीसीनं दिले होते .

पहिले शौचालय मग देवालय असं म्हटल्यांमुळे माझ्यावर टीका झाली होती पण आता या देशातल्या मुली घरात शौचालय नसेल तर  लग्न करायला नकार देत असल्याचंही मोदी म्हणाले.  ते डे  संस्कृतीचा विरोधक नसल्याचं मोदी म्हणाले. तसंच रोझ  डेप्रमाणेच पंजाबातल्या मुलांनी केरळ डे ,विविध राज्यातील मुलांनी  वेगवेगळ्या राज्यांचे डे साजरे करावे असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच आपल्या भाषणात आचार्य विनोबा भावे ,दाददासाहेब धर्माधिकारी यांचाही उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात  केला. 9/11 ची आठवणही त्यांनी करून दिली. विवेकानंदांचे शेतीविषयक ,व्यापारविषयक  विचारही त्यांनी सांगितले. भाषण चालू असताना  एका ठिकाणी सभागृहातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचा जयघोषही केला .

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळा आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणास 125 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी देशातील तरूणांशी संवाद साधण्यास सुरुवात केली

First published: September 11, 2017, 11:46 AM IST
Tags: modispeech

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading