मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; इस्लामिक स्टेटच्या कमांडरला जम्मूमध्ये अटक

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; इस्लामिक स्टेटच्या कमांडरला जम्मूमध्ये अटक

Terrorist Attack : जम्मू पोलिसांच्या (Jammu Police) विशेष पथकानं इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर (ISJK) च्या एका कमांडरला बेड्या (ISJK Commander arrest) ठोकल्या आहेत. संबंधित कमांडर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

जम्मू, 05 एप्रिल: जम्मू आणि काश्मीर भागात दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) होणं नवीन नाही. या केंद्र शासित प्रदेशात आतापर्यंत अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. पण भारतीय जवानांनीही अनेकदा त्यांचे मनसुबे पार पडू दिले नाहीत. यावेळी जम्मू पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. जम्मू पोलिसांच्या (Jammu Police) विशेष पथकानं इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर (ISJK) च्या एका कमांडरला बेड्या (ISJK Commander arrest) ठोकल्या आहेत. संबंधित कमांडर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.

जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी रविवारी सांगितलं की, केंद्रशासित प्रदेशातील इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर (ISJK) च्या एका कमांडरला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याच्या मोठा कट उधळून (big terrorist attack) लावला आहे. सिंह म्हणाले की, मलिक उमर उर्फ ​​अब्दुल्ला याला जम्मू-पोलिसांच्या विशेष ऑपरेशन टीमनं जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील झज्जर कोटली येथून अटक केली आहे. तो दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा या गावचा रहिवासी आहे.

सिंह यांनी पुढं सांगितलं की, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्याकडून आठ जीवंत काडतुसे आणि 1.13 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मलिक उमरला अटक करून त्याच्या संघटनेद्वारे घडवून आणला जाणारा दहशतवादी हल्ल्याचा कट अयशस्वी केला आहे

(हे वाचा- छत्तीसगडमधील हल्ल्यात तब्बल 700 नक्षलवादी होते सामील, जवानांविरोधात कसा रचला कट?)

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून दहशतवादी कमांडर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जम्मू पोलिसांनी झज्जर कोटली या भागात शोधमोहीम राबवली. दरम्यान एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. तेव्हा त्याच्या बॅगमधून एक पिस्टल आणि 1.13 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यानंतर केलेल्या चौकशीत संबंधित व्यक्ती आयएसजेकेचा कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी त्याला शस्त्रं आणि रोकड मिळाली होती, असंही त्याने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir