श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली, पुन्हा घातपाताची शक्यता!

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली, पुन्हा घातपाताची शक्यता!

श्रीलंकेत रविवारी झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

  • Share this:

कोलंबो, 23 एप्रिल: श्रीलंकेत रविवारी झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. श्रीलंकेत रविवारी एकापाठोपाठ एक झालेल्या 8 दहशतवादी हल्ल्यात 217हून अधिक जण ठार झाले होते. तर 450 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर लंकेत आणीबाणी लागू करण्यात आली. तर भारताने देखील गोवासह अन्य प्रमुख शहरात अलर्ट दिला होता.

हे देखील वाचा: श्रीलंका स्फोट : त्या अतिरेक्याने बहीण आणि पत्नीचाही घेतला जीव

दरम्यान मंगळवारी श्रीलंकन पोलिसांनी एक अलर्ट जारी केला आहे. यानुसार दहशतवादी पुन्हा एकदा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. श्रीलंकेत पुन्हा एकदा आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता असल्याचे भारतीय गुप्तचर विभागाने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर श्रीलंकन पोलिसांनी हा अलर्ट दिला आहे.

वाचा: श्रीलंका बॉम्ब स्फोटाचं मुंबई कनेक्शन

इस्टर संडेच्या पवित्र दिवशीच चर्चमध्ये स्फोट घडविण्यात आले होते. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला होता. याशिवाय मार्केटमध्येही करण्यात आला आहे. कोलंबोतल्या शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले होते. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने संचारबंदी लागू केली होती. त्याच बरोबर सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली होती.

बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती असूनही पोलीस निष्क्रीय; श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

देशात अशा प्रकारचे आत्मघाती हल्ले होऊ शकतात अशी माहिती पोलिसांना होती मात्र त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही असा गौप्यस्फोट श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी केला होता. विक्रमसिंगे म्हणाले, श्रीलंकेचे पोलीस प्रमुख पुजुथ जयासुंदरा यांनी आठवडापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र कुठलीही खबरदारी घेतली नाही. चर्चेसवर हल्ला होऊ शकतो अशी माहिती होती. मात्र ही माहिती वरपर्यंत दिली गेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश

दहशतवादी हल्ल्याप्रकरणी श्रीलंकेतल्या सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. त्यातल्या एका महिलेचं नाव लक्ष्मी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिली होती.

त्या अतिरेक्याने बहीण आणि पत्नीचाही घेतला जीव

ज्या आत्मघातकी अतिरेक्यांनी हे स्फोट घडवले च्यापैकीच एकाने या स्फोटात आपली पत्नी आणि बहीणीचाही बळी दिला. इन्सान सीलावन असं या आत्मघातकी अतिरेक्याचं नाव आहे. डिमेटोगोडा या कोलंबोच्या उपनगरात ही घटना घडली. कोलंबोच्या साखळी स्फोटांनंतर पोलीस जेव्हा या उपनगरात शोधमोहीम राबवत होते त्यावेळी या अतिरेक्याने स्वत:ला पेटवून घेतलं.

इमारत कोसळली

तो ज्या दुमजली इमारतीत होता ती इमारत स्फोटामुळे कोसळली. यामध्ये त्याची पत्नी आणि बहिणीचाही मृत्यू ओढवला. या स्फोटात 3 पोलीसही मारले गेले.

दहशतवाद्यांनी इस्टरच्या दिवशी पहिला स्फोट सकाळी पावणेनऊ वाजता सेंट अँथनी कॅथलिक चर्चमध्ये घडवला. दुसरा स्फोट शहराच्या बाहेरच्या भागातल्या नेगोंबोमध्ये सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये झाला. त्यानंतर लगेचच कोलंबोपासून 300 किमी अंतरावरच्या बॅक्टिलो शहरात तिसऱ्या चर्चमध्येही स्फोट झाल्याची बातमी आली.

हॉटेल्समध्ये स्फोट

कोलंबोच्या 3 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डिमॅटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.

दहा दिवसांआधी इशारा

श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.

या स्फोटांमागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात आहे, असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्येही या संघटनेच्या एका गटाच्या कारवाया सुरू आहेत. पण आतापर्यंत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

श्रीलंका स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा VIDEO व्हायरल

First published: April 23, 2019, 4:50 PM IST

ताज्या बातम्या