धक्कादायक! ISIS शी संबंध असणाऱ्या दहशतवादी काश्मिरी दांपत्याचं पुणे कनेक्शन आलं समोर
धक्कादायक! ISIS शी संबंध असणाऱ्या दहशतवादी काश्मिरी दांपत्याचं पुणे कनेक्शन आलं समोर
CAA विरोधात अधिकाधिक लोकांना एकत्र करण्याबरोबरच हे पती-पत्नी देशात आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत होते. दोघेही उच्चशिक्षित असून पुण्यात नामांकित कंपनीत काम करत होते, असं समोर आलं आहे.
नवी दिल्ली, 9 मार्च : दिल्लीत अटक झालेल्या ISIS शी संबंधित संस्थेसाठी काम करणाऱ्या संशयित दहशतवादी दांपत्याचं पुण्याशी असलेलं नातं आता उघड झालं आहे. हे पती-पत्नी आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत होते, असा पोलिसांचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली.
जहनजेब सामी आणि हिना बशीर बेग अशी या दोघांची नावं आहेत. त्यातल्या हिनाचं उच्चशिक्षण पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये झालं होतं. त्यानंतर ती पुण्यात नामांकित बँकांमध्ये नोकरीही करत असल्याचं उघड झालं आहे. पुण्यात कोटक आणि एव्हीएन अॅम्रो बँकांमध्ये तिने नोकरी केली. त्यानंतर मुंबईत मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीमध्येही तिने काम केलं.
हिनाचा नवरा सामी हासुद्धा उच्चशिक्षित आहे. त्यानंही काही काळ स्पोक डिजिटल नावाच्या पुण्याच्या कंपनीत काम केलं असल्याचं उघड झालं आहे. त्यानं पंजाबातून बी.टेक केल्यानंतर बंगळुरूच्या इन्स्टिट्यूटमधून MBA पूर्ण केलं. HP computer सारख्या मोठ्या कंपनीत तो काम करत होता. त्यानंतर 4 महिने तो नोकरीसाठी दुबईत राहिला.
दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (ISIS) या जहाल दहशतवादी संघटनेच्या खुरासान मोड्युलशी संबंधित असल्याच्या संशयावरून या दोघांना अटक केली आहे. हे पती-पत्नी दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोघांकडून संवेदनशील साहित्यही जप्त केलं आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'इंडियन मुस्लिम युनाइट' नावाने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे दोघं चालवत होते.
संबंधित- दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या कॉल डिटेल्समधून मोठा खुलासा, 12 जणांशी करीत होता बातचीत
CAA, NRC विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा हेतू होता. अटक करण्यात आलेल्या दांम्पत्याचा इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संगटनेशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही ऑगस्ट-2019 पासून दिल्लीत राहात आहेत. दाम्तत्याकडे आक्षेपार्ह दस्ताऐवज देखील आढळून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.