ISIS च्या म्होरक्या बगदादी जिवंत? 5 वर्षांनी समोर आला VIDEO

पाच वर्षांनी बगदादीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 01:25 PM IST

ISIS च्या म्होरक्या बगदादी जिवंत? 5 वर्षांनी समोर आला VIDEO

नवी दिल्ली, 30 एप्रिल : इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी जिवंत असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पाच वर्षांनी बगदादीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तो आपल्या साथिदारांसह दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही.

बगदादी या व्हिडीओमध्ये सीरियाबद्दल बोलताना दिसत आहे. ज्या ठिकाणंचं युद्ध गेल्या महिन्यात संपल ते इसिसचं ठाणं बागोज हे होतं. व्हिडीओत तोसुद्धा बागोजचा उल्लेख करताना दिसतो.

यापूर्वी 2018 मध्ये इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीची ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यात त्याने मुस्लिमांना जिहादचे आवाहन केलं होतं. तसेच पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्याबद्दलही त्यानं वक्तव्य केलं होतं. इराक आणि सीरियामधील इसिसच्या ताब्यातील भाग उद्ध्वस्त केल्यानंतर चिडलेल्या बगदादीने ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती.

2014 मध्ये सीरिया आणि इराकमधील मोठ्या भागावर इसिसनं ताबा मिळवला होता. त्या भागावर आपलं राज्य असल्याचं सांगत बगदादीनं स्वत:ला खलीफा घोषित केलं होतं. मात्र, आता या दोन्ही देशातून इसिसचा जवळपास नायनाट करण्यात आला आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...