इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण: वंजारा आणि अमीन दोषमुक्त

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी डी.के.वंजारा आणि एन.के. अमीन यांना दोषमुक्त केले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 03:14 PM IST

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण: वंजारा आणि अमीन दोषमुक्त

अहमदाबाद, 02 मे: इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी डी.के.वंजारा आणि एन.के. अमीन यांना दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी कोर्टाने 30 एप्रिल रोजी निर्णय सुरक्षित ठेवला होता.

या खटल्याप्रकरणी वंजारा आणि अमीन यांनी कोर्टाला विनंती केली होती ती इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सुरु असलेली कारवाई थांबवण्यात यावी. वंजारा यांच्या वकीलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि ही चकमक बनावट नसल्याचे सांगितले.

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी 2013मध्ये सीबीआयद्वारे प्रथम दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गुजरातमधील ७ पोलिस अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते. यात आयपीएस अधिकारी पी.पी.पांड्ये, डी.जी.वंजारा आणि जीएल.सिंघल यांना इशरत जहाँ चकमक प्रकरणी अपहरण, हत्या आणि कटा प्रकरणी आरोपी करण्यात आले होते.

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO


Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...