मराठी बातम्या /बातम्या /देश /

PM Awas Yojana 2022: पंतप्रधान आवास योजनेच्या नव्या यादीत तुमचं नाव आहे की नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

PM Awas Yojana 2022: पंतप्रधान आवास योजनेच्या नव्या यादीत तुमचं नाव आहे की नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं (Dream Home) असं प्रत्येकाला वाटतं; पण अनेकांना ते विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. देशातील प्रत्येकाचं हक्काच्या घराचं स्वप्नं पूर्ण व्हावं यासाठी सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana 2022) राबवण्यात येते. देशातील लाखो लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 जून-   आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं (Dream Home) असं प्रत्येकाला वाटतं; पण अनेकांना ते विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. देशातील प्रत्येकाचं हक्काच्या घराचं स्वप्नं पूर्ण व्हावं यासाठी सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana 2022) राबवण्यात येते. देशातील लाखो लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे. तुम्हीही जर या योजनेअंतर्गत नाव नोंदवलं असेल तर तुमचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या योजनेची यादी चेक ( PM Awas Yojana New List 2022) करु शकता. याबाबतचं अधिक वृत्त आजतकच्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana 2022) पठारी प्रदेशातील लोकांना एक लाख 20 हजार रुपयांची तर डोंगराळ प्रदेशातील लोकांना एक लाख 30 हजार रोख रकमेची मदत सरकारच्या वतीने केली जाते.

संपूर्ण देशभरात पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana 2022) लागू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांमधून सरकारच्या वतीने निवड करून यादी तयार केली जाते. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत अर्ज (Application) केला असेल तर पंतप्रधान आवास योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुमचं नाव यादीत आहे की नाही ते तपासून बघू शकता. त्यासाठी एक प्रक्रिया आहे.

- सगळ्यांत आधी PM Awas Yojana च्या वेबसाईटवर जा.

- त्यानंतर होम पेजवर Menu सेक्शनमध्ये जा.

- त्यानंतर Search Beneficiary च्या अंतर्गत Search By Name हा पर्याय निवडा.

- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.

- त्यामध्ये तुम्ही तुमचा 12 आकडी आधार क्रमांक टाका आणि Show या बटणावर क्लिक करा.

- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर लाभार्थ्यांची (List Of Beneficiaries) यादी दिसेल.

- तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुमचं नाव या यादीत दिसेल.

(हे वाचा: बेरोजगारांच्या जीवात जीव आणणारी बातमी! 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये इतके टक्के वाढलं जॉब मार्केट, टेन्शन होईल दूर)

आता पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PM Awas Yojana Gramin) ची नवी यादी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx या वेबसाईटवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PM Awas Yojana Gramin) ची नवी यादी पाहू शकाल. तुमचं नाव जर या यादीत असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल.

तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्नं पूर्ण करायचं असेल तर पंतप्रधान आवास योजनेचा नक्की फायदा घ्या. त्यासाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया करायला विसरु नका.

First published:

Tags: Modi government, Scheme