पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिणेतूनही निवडणुकीच्या रिंगणात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिणेतूनही निवडणुकीच्या रिंगणात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिणेतूनही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असल्यानं काँग्रेसनं आपला येथील उमेदवार राखून ठेवल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

बंगळुरू, 24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 'डेक्कन हेराल्ड'नं याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी बंगळुरू उत्तर किंवा बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यानं पंतप्रधान मोदीदेखील आता बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी वाराणसी आणि बंगळुरू दक्षिण या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी भाजपनं गुरुवारी (21 मार्च) येथील 21 उमेदवारांची नावं जाहीर केली. पण ऐनवेळेस बंगळुरू दक्षिण मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा रद्द करण्यात आली.

बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून केंद्रीय मंत्री दिवंगत अनंतकुमार तब्बल सहावेळा निवडून आले होते. याच जागेहून त्यांच्या पत्नी निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. याबाबत घोषणादेखील केली जाणार होती, मात्र ऐनवेळेस पक्षाकडून निर्णय बदलण्यात आला. तर दुसरीकडे, शनिवारी(23 मार्च) रात्री कर्नाटकातून 18 जागांवरील उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. पण बंगळुरू दक्षिण आणि धारवाड या जागांवरील नावांबाबत काँग्रेसकडून  सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

वाचा अन्य बातम्या

काँग्रेसची राज्यातील आणखी एक यादी जाहीर, नांदेडमधून अशोक चव्हाण मैदानात

अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काँग्रेसला मराठवाड्यातही हादरा?

'दानवे-खोतकरांमध्ये सेटलमेंट झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही'

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, पंतप्रधान मोदी बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या कारणामुळे काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारत या जागेवरील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून आपला उमेदवार राखून ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मोदींविरोधात काँग्रेस त्यांच्याच तोडीचा उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी खरंच येथून निवडणूक लढवणार आहेत का? याबाबत स्थानिक भाजप नेत्यांकडूनही अद्याप अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.दुसरीकडे, पोलीस प्रशासनाकडून सोमवारी (25 मार्च) शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारण, सोमवारी मोठा नेता याठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

SPECIAL REPORT : मराठमोळा स्पायडरमॅन, अवघ्या 16 मिनिटात 3100 फुटांचा लिंगाणा सर?

First published: March 24, 2019, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading