S M L

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरंच शक्य आहे का?

ज्या फोनवरून तुम्ही चिनी वस्तूंवरच्या बहिष्काराचे नारे लगावताय, तोच फोन चिनी आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 12:41 PM IST

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरंच शक्य आहे का?

06 जुलै : चीन आणि भारत सीमेवर चणाव जसजसा वाढतोय, तसतशा फेसबुक,ट्विटर, व्हाॅट्सअपवर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका अशा पोस्टही वाढतायत. पण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरोखर शक्य आहे का? ज्या फोनवरून तुम्ही चिनी वस्तूंवरच्या बहिष्काराचे नारे लगावताय, तोच फोन चिनी आहे.

भारतात  अमेरिकन प्राॅडक्ट म्हणून वापरण्यात येणाऱ्या वस्तूही चीनमधूनच आलेल्या असतात. फोन, लॅपटाॅप सगळ्यामध्ये चीनमध्ये तयार झालेल्या तांत्रिक गोष्टी असतात. दिवाळीत अनेकांच्या घरावरची रोषणाई ही स्वस्त चायनीज दिव्यांची असते.

याशिवाय स्वदेशी म्हणून ज्या वस्तू खरेदी केल्या जातात, त्याही चायनीज असतात. दुकानात मिळणाऱ्या हिंदू देवदेवतांच्या मूर्ती चायनीज असतात. स्वदेशी शर्टाची बटन्स चायनीज असतात, हे कुणाच्या लक्षातही नसतं. घरातलं विजेचं सामान घ्या किंवा परफ्युम, तो चीनमध्येच बनला असतो.

भारत आणि चीनमध्ये सीमेवर कितीही तणाव असला तरी दोघांचे व्यावसायिक संबंध मजबूत आहेत. दोन देशांमध्ये दर वर्षी 70 अब्ज डाॅलर्सचा व्यवसाय होतोय.

Loading...
Loading...

त्यामुळे खरोखर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणं शक्य होईल का, याचा विचार करावा लागेल. 'हाय हाय'चे नारे लगावण्यापेक्षा मेक इन इंडियाकडे लक्ष द्यावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 12:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close