'पंतप्रधान मोदींसाठी 8400 कोटींचं विमान आणि जवानांसाठी बुलेट प्रुफ नसलेला ट्रक, हा न्याय आहे?'

'पंतप्रधान मोदींसाठी 8400 कोटींचं विमान आणि जवानांसाठी बुलेट प्रुफ नसलेला ट्रक, हा न्याय आहे?'

राहुल गांधींनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करीत त्यांनी विचारलं की पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपये खर्च करीत आलिशान फ्लाइट मागवलं आणि सैनिकांना विना बुलेट प्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवलं. त्यांनी ट्विट केलं आहे की, आमच्या जवानांना नॉन-बुलेट प्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 8400 कोटींचं विमान. हा न्याय आहे का?

आज पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रकमध्ये जवान बसले आहेत जे एकमेकांसोबत बोलत आहेत. त्यापैकी एक जवान म्हणतो की, नॉन बुलेट प्रुफ गाडींमध्ये पाठवून आमच्या जीवासोबत खेळलं जात आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात पंजाबच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी आरोप केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशविरोधी नीती आणि कारवायांमुळे देश कमकुवत झाला आहे.

राहुल गांधींकडून सातत्याने चीनसोबत वाद सुरू आहे आणि जवानांना मिळणाऱ्या सुविधांचा मुद्दा समोर आणला जात आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी ट्विट केलं होतं की, पंतप्रधानांनी स्वत:साठी 8400 कोटींचं विमान खरेदी केलं, इतक्या पैशात सियाचिन-लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी बरंच काही करता आलं असतं. गरम कपडे - 30,00,000, जॅकेट, हँडग्लोज : 60,00,000..शूज: 67,20,000..ऑक्सिजन सिलेंडर: 16,80,000..पंतप्रधानांना केवळ आपल्या इमेजची चिंता आहे सैनिकांची नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: October 10, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या