News18 Lokmat

भारत हिंदू राष्ट्र आहे का? सोशल मीडियाच्या सर्व्हेत समोर आली आश्चर्यकारक आकडेवारी

भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे, असं मानणारे सोशल मीडियावर जास्त लोक आहेत. 14 ते 15 टक्के लोक असाच विचार करतात. या सर्वेक्षणात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांच्या युझर्समध्ये हा सर्व्हे केला गेला.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 03:39 PM IST

भारत हिंदू राष्ट्र आहे का? सोशल मीडियाच्या सर्व्हेत समोर आली आश्चर्यकारक आकडेवारी

फाज़िल खान

नवी दिल्ली, 13 जून : भारत हा फक्त हिंदूंसाठी आहे का? एका सर्व्हेमध्ये आलेल्या आकडेवारीमध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. 'सेंटर ऑफ स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' या संस्थेने सोशल मीडिया आणि नव्या माध्यमांच्या आधारे एक सर्वेक्षण केलं आहे.

भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे, असं मानणारे सोशल मीडियावर जास्त लोक आहेत. 14 ते 15 टक्के लोक असाच विचार करतात. या सर्वेक्षणात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांच्या युझर्समध्ये हा सर्व्हे केला गेला.

CSDS चा सर्व्हे

CSDS या संस्थेने गेल्या 5 वर्षांचा डाटा घेऊन हे सर्वेक्षण केलं, या सर्व्हेत कधीकधी सप्ताहामध्ये एकदा किंवा रोज लोकांची मतं आजमावण्यात आली. जे सोशल मीडियावर नाहीत त्यांचंही मत घेण्यात आलं. या एकूण सँपलमध्ये 73 टक्के लोकांना, भारतात सगळे धर्म समान आहेत, असं वाटतं. पण बरेचसे लोक याच्याशी सहमत नाहीत. सोशल मीडियाचा उपयोग करणारे बहुतांश लोक भारत हे हिंदूराष्ट्र आहे, असं मानतात.

Loading...

हिंदुत्वाचा वाढता प्रभाव

सोशल मीडियाचा वापर करणारे 19 टक्के लोक भारत केवळ हिंदूंचा देश आहे, असं मानतात. त्याचबरोबर सोशल मीडिया न वापरणारे 17 टक्के लोक भारत केवळ हिंदूंचा आहे, असं मानतात. त्यांच्या मते, भारतात हिंदुत्वाचा प्रभाव वाढला आहे.

सोशल मीडिया न वापरणाऱ्या 73 टक्के लोकांना भारत हा लोकशाही देश आहे, असं वाटतं. इथे सगळे धर्म समान आहेत,असंही त्यांना वाटतं.

धार्मिक विचार मांडण्याची जागा

या अहवालात म्हटलं आहे, सोशल मीडिया तुमच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकू शकतं. इथे तुम्हाला स्वत:ची भूमिका मांडता येते आणि धार्मिक विचार इतरांशी शेअर करण्यासाठी जागाही मिळते.

सोशल मीडिया युझर्स असलेले हिंदू मतदार, मुस्लीम जास्त राष्ट्रवादी असल्याचं मानतात. पण त्याचवेळी फेसबुक, ट्विटरचा वापर करणारे काही लोक मुस्लिमांना राष्ट्रवादी मानत नाहीत.

CSDS ने हा सर्व्हे एप्रिल ते मे महिन्यात केला. 26 राज्यांमध्ये 211 मतदारसंघांमध्ये थेट फिल्डवर जाऊन हा सर्व्हे केला गेला. यामध्ये एकूण 24 हजार 236 मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

===========================================================================

औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...