कर्नाटकचा विजय नरेंद्र मोदींना ठरू शकतो धोकादायक ?

कर्नाटकचा विजय नरेंद्र मोदींना ठरू शकतो धोकादायक ?

मागील दोन दशकात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी पक्षाला दिल्लीतील सत्ता सोडावी लागली.

  • Share this:

कर्नाटक,15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे तर जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. पण, कर्नाटकमधला विजय नरेंद्र मोदी यांच्यासाठी 2019 मध्ये अवघड ठरू शकतो. कर्नाटक निवडणुकीचा इतिहास पाहिला तर ज्यांनी कुणी कर्नाटकची निवडणूक जिंकली त्याला दिल्लीची गादी सोडावी लागली.

मागील दोन दशकात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी पक्षाला दिल्लीतील सत्ता सोडावी लागली. 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्थापन केले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2013 च्या कर्नाटक निवडणुकीत भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 लोकसभा निवडणुकीत फक्त एका वर्षानंतर 28 जागेपैकी 17 जागेवर विजय मिळवला.

2008 विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली. पण त्यानंतर 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. 2004 मध्ये कर्नाटक निवडणुकीत जनता दल सेक्युलर (जेडीएस) विजयी झाली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी लोकसभा निवडणुकीत जेडीएसला पराभवाला सामोरं जावं लागलं. 1999 मध्येही काँग्रेससोबत असचं घडलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली त्यानंतर दुसऱ्या वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

1994 मध्येही जेडीएसने सत्ता स्थापन केली. पण 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. याआधी 1989 मध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली पण 1989 लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.

अमित शहा म्हणाले ही तर अंधश्रद्धा

मतदानापूर्वी अमित शहांना याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.1967 मध्ये काँग्रेसचं सरकार कर्नाटकमध्येही होतं आणि दिल्लीतही होतं. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत जे काही झालं तो एक योगायोग असू शकतो असं अमित शहा म्हणाले.

First published: May 15, 2018, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading