प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे दाऊदला खरंच भारतात यायचं होतं का?

प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे दाऊदला खरंच भारतात यायचं होतं का?

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपावरून आता राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दाऊदला खरंच भारतात परत यायचं होतं का? माजी IPS अधिकारी याविषयी सांगताहेत...

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर अंडवर्ल्ड डॉन दाऊदबाबत गंभीर आरोप केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या की, खरंच दाऊदला भारतात यायचं होतं का? मग त्याला का रोखलं? कुणी आडकाठी केली? काय होत्या त्याच्या अटी?

'कुख्यात दाऊद इब्राहिम याने भारताकडे आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 1993मध्ये राम जेठमलानी यांनी यासंदर्भातील प्रस्तावही शरद पवार यांच्याकडे दिला होता. पण पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं', असा गंभीर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी दाऊदबाबत खुलासा करावा, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

दाऊद इब्राहिमवरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

या सर्व आरोपांबाबत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांना विचारलं असता त्यांनी ' हे सारे आरोप तथ्यहीन आहेत असं सांगितलं. ते म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. उगाच आरोप करू नयेत. जेठमलानी यांनी दाऊदचं वकिलपत्र घेतलं होतं का? शिवाय, दाऊदला पाकिस्तान भारतात का पाठवेल?  दाऊद पाकिस्तानमध्ये आहे. पुरावे देऊन देखील पाकिस्तान दाऊद आमच्याकडे नाही असं म्हणतो. पहिल्यांदा त्यांनी दाऊद आमच्याकडे आहे हे मान्य करावं. तसेच दाऊद हा देशाचा गुन्हेगार आहे. त्याला फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ शकते का? त्याला भारतात आणताना त्यांच्या अटी आपण का पाळाव्यात? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री योगींची 2 वर्षं : गणिताचा विद्यार्थी अजयमोहन बिष्ट असा झाला संन्यासी आणि मग उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री

प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. 'प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेला आरोप हा निव्वळ हास्यास्पद असून, अर्धवट ज्ञान असल्याचं उदारण आहे.राम जेठमलानिंनी जो प्रस्ताव दिला होता, त्या प्रस्तावात 'मी जर शरण आलो, तर मला माझ्या घरी ठेवयचं आणि संपूर्ण चौकशीसुद्धा माझ्या घरीच करायची' अशी अट दाऊदनं घातली होती. 450 मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या गुन्हेगाराला का म्हणून घरी ठेवायचं? त्याला जेलमध्येच ठेवावं लागेल असा निर्णय झाल्यामुळेच पवारांनी राम जेठमलानींचा तो प्रस्ताव नाकारला,'' असं आव्हाड म्हणाले. दाऊदच्या या अटीला तुम्ही मान्यता दिली असती का? असा थेट सवाल आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना केला आहे.

दरम्यान दाऊदच्या प्रश्वावरून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

VIDEO: 'दाऊदच्या या अटीला तुम्ही मान्यता दिली असती का?'

First published: March 19, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading