S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

Loksabha 2019 : अशोक चव्हाण नांदेडमधून निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसला वाटते 'ही' भीती

नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

Updated On: Mar 19, 2019 11:35 AM IST

Loksabha 2019 : अशोक चव्हाण नांदेडमधून  निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसला वाटते 'ही' भीती

नवी दिल्ली, 19 मार्च : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून निवडणूक लढवण्याबाबत हायकमांडने आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्याऐवजी अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवावी यासाठी पक्षाच्या हायकमांडने आग्रह धरला आहे. जर प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवणार नसतील तर चुकीचा संदेश जाण्याची भीती असल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांच्या निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केलीय. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवारांची बैठक झाली. सुजय विखेंचा प्रश्न योग्यरितीनं न हाताळल्याबद्दल तसंच त्यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. सुजयचा मुद्दा व्यवस्थित न सोडवल्याची हायकमांडची भावना आहे.


राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांची एकत्रित चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील स्थितीबाबत आणि जागावाटपावर तासभर चर्चा करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपाचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close