'आयर्न लेडी' इरोम शर्मिला अखेर अडकल्या विवाह बंधनात

'आयर्न लेडी' इरोम शर्मिला अखेर अडकल्या विवाह बंधनात

सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला आपल्या प्रियकरासोबत विवाह बंधनात अडकल्या आहेत.

  • Share this:

17 आॅगस्ट : सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला  आपल्या प्रियकरासोबत विवाह बंधनात अडकल्या आहेत. तामिळनाडूमध्ये डिंडीगुल जिल्ह्यातील विवाह नोंदणी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात विवाह सोहळा पार पडला.

सब-रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱ्याने न्यूज संस्था आईएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी सकाळी कार्यालयात येऊन लग्नाची औपचारिकता पूर्ण केली अशी माहिती दिली.

शर्मिला यांनी मणिपूरमध्ये आर्म फोर्सेस कायदा आफ्सा विरोधात 16 वर्ष उपोषण केलं होतं. या वर्षी शर्मिला यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कोडइकनालमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करण्याची घोषणा केली होती.

सब-रजिस्ट्रार कार्यालयात लग्नासाठी दोन महिन्यांची नोटिसीच्या काळात काही राजकीय संघटनांनी शर्मिला यांना विरोध केला होता तर काही संघटनांनी समर्थन दिलं होतं.

हात पकडला म्हणून प्रियकराला झाली होती मारहाण

शर्मिया आणि त्यांच्या प्रियकर डेसमंड कौतन्हो यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळून आले होते. एकदा डेसमंड यांनी कोर्टात शर्मिला यांचा हात पकडला होता. ते पाहून कोर्टात उपस्थिती महिलांनी त्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर त्याने पुन्हा कधी कोर्टात येणे बंद केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 08:51 PM IST

ताज्या बातम्या