S M L

माझा संघर्ष चालूच राहणार- इरोम शर्मिलांनी घेतले अण्णांचे आशीर्वाद

मणिपूरमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शर्मिला ह्या आता तामिळनाडू मध्ये राहतात. अण्णांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनात यश अपयश येतच असते.

Chittatosh Khandekar | Updated On: May 10, 2018 10:06 PM IST

माझा संघर्ष चालूच राहणार- इरोम शर्मिलांनी घेतले अण्णांचे आशीर्वाद

10 मे: मणिपूरमध्ये सैन्यबलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची  आज  भेट घेतली आहे. तसंच आपला संघर्ष यापुढे सुरूच राहणार असल्याचं सांगत त्यांनी अण्णांचे आशीर्वाद ही घेतले आहेत.

मणिपूरमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शर्मिला ह्या आता तामिळनाडू मध्ये राहतात.  अण्णांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनात यश अपयश येतच असते. पण आपण नैराश्य येऊ द्यायचे नसते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करताना मलाही खूप त्रास झाला. जेलमध्ये जावे लागले. धमक्यांना सामोरे जावे लागले. पण अशा वेळी तुम्हाला डगमगून चालत नाही. तरच तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता. असा उपदेश अण्णांनी त्यांना केला.

अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीस आपले नेहमीच सक्रीय समर्थन असेल असेही शर्मिला यांनी सांगितले. मणिपूर हे आजही विकासापासून वंचित असून तिथे सामान्य लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. तिथे साधे रस्तेही नसून अण्णांनी एकदा मणिपूरमध्ये यावे अशी विनंती त्यांनी केली. आपण समर्पित भावनेने समाजाच्या हितासाठी काही करत असताना लोक मात्र उदासिन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

16 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यात आपल्याला सुरुवातीस लोकांचा पाठिंबा मिळाला. पण हळूहळू तो कमी होत गेला. त्यामुळे तिथे एक व्यापक जनआंदोलन उभे राहू शकले नाही. आज मी एक भरकटलेली सामान्य कार्यकर्ती आहे. पण समाजासाठी मला काहीतरी करायचंय. त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी मी अण्णांकडे आले आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2018 10:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close