नवी दिल्ली 29 जून: देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हे संकट दिर्घकाळ चालणार असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला Insurance Regulatory and Development Authority (IRDA) दिर्घ आणि छोट्या मुदतीच्या योजना आणण्याचे निर्देश दिले आहेत. COVID Insurance Policy किंवा कोविड कवच विमा (COVID Kanach Bima) अशा स्वरुपात त्या योजना असणार आहेत. 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत हा विमा असू शकेल.
सर्व देशात यासाठी एकच प्रिमियम असावं असंही सांगण्यात आलं आहे. आणि त्याची रक्कम एकदाच भरावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे त्या योजनांचा प्रिमियम वेग वेगळा असू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.
या योजनेत COVID-19 सोबतच काही जुन्या आजारांवरही उपचार झाले पाहिजेत असंही IRDA ने म्हटलं आहे. त्याचबरोबर, हॉस्पिटलमध्ये किंवा घरी उपचार झाल्यावर, आयुष मार्फेत उपचार झाल्यावर त्याचबरोबर आजारापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचा समावेशही यात करण्यात आला आहे. 10 जुलैपूर्वी या योजना सुरू व्हाव्यात असेही निर्देश देण्यात आले आहेत.
हे वाचा - 24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; 2 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. (Lockdown in Maharashtra Extended)
हे वाचा - नव्या Lockdownमध्ये काय राहणार सुरू, काय बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या!
MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.
अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Insurance scheme