मुंबई, 14 सप्टेंबर : पुढच्या महिन्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाश्यांसाठी एक खास ऑफर (IRCTC Tour offer) आणली आहे. ‘इसेन्स ऑफ हिमालया’ (ESSENCE OF HIMALAYAS) असं या ऑफरचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला हिमाचल प्रदेशातलं मनाली आणि शिमला फिरण्यासाठी जाता येणार आहे. हा प्रवास 7 दिवसांचा (7 days tour package) असेल. यामध्ये रेल्वे विभागच प्रवाश्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय (Accommodation and meals ) करणार आहे. या पॅकेजसाठी तुम्हाला फक्त 28,840 रुपये खर्च करावे लागतील. ही नेमकी ऑफर काय आहे, हे जाणून घेऊयात.
7 दिवसांचे हे पॅकेज असेल. यामध्ये 10 ऑक्टोबर 2021 ला पहिल्या दिवशी दिल्लीहून मनाली हा प्रवास असेल. मनाली येथेच राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था केलेली असेल. दुसऱ्या दिवशी मनालीतील हिडिंबा मंदिर, मनू मंदिर आणि वशिष्ठ कुंड यासारख्या अनेक ठिकाणी भेट दिली जाईल. दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था मनालीमध्ये केली जाईल. तिसऱ्या दिवशी पुन्हा मनालीमधील आणखी काही पर्यटन स्थळे दाखवली जातील. त्यानंतर चौथ्या दिवशी मनालीहून शिमला हा प्रवास केला जाईल. पाचव्या दिवशी कुफरीमधील पर्यटनस्थळं पाहता येतील. तिथेच पाचव्या दिवशीचा मुक्काम आणि जेवण असेल. सहाव्या दिवशी शिमला ते मनाली हा प्रवास आणि 15 ऑक्टोबरला दिल्ली ते गुवाहाटी हा प्रवास असेल.
Soak in the ethereal beauty of #India's favourite hill station, #Manali by booking our exciting 7D/6N 'Essence of Himalayas' air tour package in just Rs. 28,840/-pp*. More details on https://t.co/dbNpcuruSE. *T&C Apply
— IRCTC (@IRCTCofficial) September 10, 2021
अशी आहे पॅकेजची माहिती
पॅकेजचे नाव – Essence of Himalayas Air Package Ex-GHY
सामाविष्ट ठिकाणं - मनाली व शिमला
गुवाहाटी ते दिल्लीपर्यंतचा येण्याजाण्याचा प्रवास विमानाने असेल.
या पॅकजेमध्ये 6 रात्री / 7 दिवस सामाविष्ट आहेत.
10 ऑक्टोबरला प्रवासाला सुरुवात होणार आहे.
प्रवाशांची संख्या - 10
नाश्ता आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये सामाविष्ट आहे.
खर्च किती ?
हे संपूर्ण पॅकेज एका व्यक्तीसाठी घ्यायचे असेल तर 38,590 रुपये खर्च येईल. दोन व्यक्तींसाठी पॅकेज घेतले तर प्रति व्यक्ती 29,530 रुपये आणि तीन व्यक्तींसाठी पॅकेज घेतले तर प्रति व्यक्ती 28,840 रुपये खर्च येईल. याशिवाय, 5 ते 11 वर्ष वयोगटातील मूल असेल तर 26,220 रुपये आणि 2 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 23,710 रुपये खर्च येईल.
इथे करा संपर्क
या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी काही नंबर आणि मेल आयडी देण्यात आले आहेत. याठिकाणी संपर्क करून तुम्ही या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकता.
ऋतुपर्ण फुकान (+91 6002912335)
हिमांगशु बेझबरुआ (+91 8638507592)
विश्वजित दास (+91 9957644166)
श्री. सावमा ( + 91 9957644161)
श्री. जीएस (+91 9731704869)
ई मेल: tourroghy@irctc.com
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh, IRCTC