प्लास्टिक बंदीचा असाही परिणाम! पाहा ट्रेनमध्ये तुम्हाला कसं मिळणार पाणी

प्लास्टिक बंदीचा असाही परिणाम! पाहा ट्रेनमध्ये तुम्हाला कसं मिळणार पाणी

IRCTC कंपनीकडून प्रायोगिक तत्वावर नवी दिल्ली ते लखनऊ ट्रेनमध्ये मोहीम.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर रेल्वेकडूनही पाण्याच्या बाटल्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्तानं (2 ऑक्टोबरपासून)प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. नव्या नियमानुसार एकदा वापरलं जाणाऱ्या आणि पातळ प्लास्टिक पिशव्यांवर केंद्र सरकारनं बंदी आणली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे कॅटरींगची सुविधा देणारी आयआरसीटीसी या कंपनीने एक मोठं पाऊल उचललं आहे. IRCTC कंपनी रेल्वे स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये पाण्याचं पॅकेजिंग बदलणार आहे. रेल नीरा सारखं पाणी IRCTC कंपनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देते. त्याचं पॅकेजिंग बदलून आता नव्या स्वरुपात उपलब्ध होईल. बायोडिग्रेडेबल मटेरियलचा वापर करून बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना असा घेता येईल सेवेचा लाभ

IRCTCने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार सिंगल युझर प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यासाठी रेल नीरा नव्या स्वरूपात प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. याचं पॅकेजिंग Bio-degradable असल्यामुळे कोणतीही हानी होणार नाही. हे चाचणीदरम्यान सिद्ध झालं आहे. ही मोहीम सध्या प्रायोगिक तत्वावर लखनऊ ते नवी दिल्ली या ट्रेनमधील प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेल नीरामधून साधारण दरवर्षी 176 कोटींची कमाई होते. रेल्वेच्या एकूण कमाईपैकी 7.8 टक्के वाटा हा रेल नीराचा असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल नीराचे देशभरात 10 प्रकल्प आहेत. वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी 6 प्रकल्प उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारकडून 6 गोष्टींवर प्रतिबंध लावण्यात आले होते. आधीच अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला या निर्णयामुळे आणखीन मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. रॉयटर्स कंपनीच्या अहवालानुसार सरकारने प्लास्टिक बॅग, कप, प्लेट, बाटली, स्ट्रॉ आणि काही ठरावीक गोष्टींवर बंदी घातली नाही. मात्र लोकांनी प्लास्टिक वापरू नये म्हणून त्यांना प्रोत्साहीत करत आहे. असं असलं तरही दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी अधिकारी प्लास्टिक आढळल्यास जवळपास 5 ते 10 हजारांचा दंड आकारत आहे.

प्लास्टिकबंदीबाबत लोकांमध्ये जनजागृती

पर्यावरण मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी चंद्र किशोर मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार 'पहिल्या टप्प्यात आधी सरकारने लोकांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबाबत आवाहन आणि जागरुकता निर्माण करायला हवी. लोकांना त्याचं महत्त्व समजलं तर आपोआपच प्लास्टिकचा वापर कमी होईल. दुसऱ्या टप्प्यात प्लास्टिकसाठी लोकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर लोकांना आवाहन करावं'.

सिंगल यूज प्लास्टिक काय आहे

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे असं जे तुम्ही एकदाच वापरू शकता. त्यामध्ये जास्त केमिकलचा वापर करण्यात येतो. घनता कमी असल्यानं आणि त्यामध्ये बायोडिग्रेडेब कंटेन्ट नसल्यानं त्याचं विघटनही होत नाही. त्याचा पुन्हा वापरही केला जाऊ शकत नाही. अशा प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी प्रशासनाकडून, पर्यावरण प्रेमींकडून आवाहन केलं जात आहे.

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

Published by: Kranti Kanetkar
First published: October 6, 2019, 2:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading