खुशखबर! ट्रेनचा प्रवास करताना आता खिशात आयडी ठेवण्याची नाही गरज

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना एक नवी सुविधा दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 08:35 PM IST

खुशखबर! ट्रेनचा प्रवास करताना आता खिशात आयडी ठेवण्याची नाही गरज

मुंबई, 10 एप्रिल : ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना आता आयडी प्रूफची हार्ड काॅपी जवळ बाळगण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेनं प्रवाशांना एक नवी सुविधा दिलीय. प्रवासी आता एम आधारला आयडी प्रूफ म्हणून वापरू शकतात. IRCTCच्या ट्विटप्रमाणे प्रवासी प्रवास करताना एम आधार, ई आधार, ड्रायव्हिंग लायसन्सचं आयडी प्रूफ यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हार्ड काॅपी न बाळगता मोबाइलच्या मदतीनं तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता.

फोनमध्ये डाऊनलोड करा M Aadhaar - तुम्ही M Aadhaar अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करा. यामुळे ओळख सिद्ध करण्याची आणि आयडी प्रूफ दाखवण्याची प्रक्रिया सोपी होणार. याद्वारे आधारकार्डधारक आपलं नाव, पत्ता, वय, फोटो ही सर्व माहिती फोनमध्ये घेऊन तुम्ही बिनधास्त राहू शकता. हे अॅप अँड्राॅइड युजरसाठी आहे. आयओएस युजरसाठी थोडी वाट पहावी लागेल. अँड्राॅइड युजर गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करू शकतात.

ई आधार काय आहे? ई आधार पासवर्डसहित सुरक्षित आधारकार्ड आहे. यावर UIDAIची डिजिटल स्वाक्षरी असते. आधार अधिनियमअनुसार ई आधारला मान्यता आहे.

सध्या आधारकार्ड सगळ्याच बाबतीत महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे ते जर हरवलं तर अनेक समस्या निर्माण होतील. पण आता त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. तुमचं आधारकार्ड हरवलं असेल तर आता त्याची रिप्रिंट काढता येणार आहे.

UIDAIच्या वेबसाईटवर ऑर्डर आधार रिप्रिंट असा पर्याय देण्यात आला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं आधारकार्ड अपडेट करूनदेखील रिप्रिंट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

Loading...


VIDEO : जळगावात मारहाण झालेल्या भाजपच्या माजी आमदाराची पहिली प्रतिक्रियाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...