मराठी बातम्या /बातम्या /देश /

'इराणमधून भारताच्या हद्दीत घुसलेल्या विमानात बॉम्ब..' पाकिस्तानमधून आला फोन अन् मग...

'इराणमधून भारताच्या हद्दीत घुसलेल्या विमानात बॉम्ब..' पाकिस्तानमधून आला फोन अन् मग...

फाईल फोटो

फाईल फोटो

हवाई दलाच्या सुखोई विमानांनी या विमानाला सुरक्षित अंतरावरून वेढले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : इराणमधील तेहरान येथून भारताच्या हवाई हद्दीत आलेल्या विमानात कथित बॉम्ब विमानाने देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये तब्बल 1 तास खळबळ उडवून दिली. या विमानाला दिल्लीच्या हवाई हद्दीत उतरायचे होते, पण प्रसंगावधान लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने या विमानाला जयपूर किंवा चंदीगडमध्ये उतरण्याचा पर्याय दिला. मात्र, या विमानाच्या कर्मचाऱ्यांनी हे मान्य केले नाही.

याआधी इराणच्या महान एअरचे फ्लाइट क्रमांक W581 तेहरानहून चीनच्या ग्वांगझू शहरात जात होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांना फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते. काही मिनिटांतच विमानाने पाकिस्तानची हवाई हद्द पार करून भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली की तेहरानहून उड्डाण घेतलेल्या विमानात बॉम्ब असण्याची शक्यता आहे आणि हे विमान दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करू शकते.

पाकिस्तानमधून आलेल्या या माहितीनंतर दिल्ली विमानतळ, हवाई दल आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांना सतर्क केले. बॉम्बचा धोका किंवा आपत्कालीन लँडिंग या दोन्हीसाठी दिल्ली विमानतळाला सज्ज तयार करण्यात आले होते. त्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांनीही रात्री 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि बॉम्बच्या धोक्याचा हवाला देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.

पण दिल्ली एअर ट्रॅफिकने लगेचच भारतीय हवाई दलाला सतर्क केले. काही मिनिटांतच भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानांना सतर्क करण्यात आले. इराणचे हे विमान कोणत्याही प्रकारे दिल्लीत उतरू नये, यासाठी भारतीय हवाई दलाच्या दोन सुखोई विमानांनी या इराणी विमानाला भारतीय हवाई हद्दीत घेरले.

हेही वाचा - LCH : पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल, 'या' वैशिष्ट्यांमुळे भरणार शत्रूला धडकी!

हवाई दलाच्या सुखोई विमानांनी या विमानाला सुरक्षित अंतरावरून वेढले होते. त्यानंतर या विमानाच्या क्रूशी संपर्क झाला. काही काळानंतर, परिस्थिती समजून घेत भारतीय हवाई दलाने हे विमान जयपूर किंवा चंदीगडमध्ये उतरवण्याचा पर्याय दिला. पण विमानाच्या पायलटने जयपूर किंवा चंदीगडमध्ये उतरण्यास मान्य केले नाही. दरम्यान, भारतीय सुरक्षा संस्थांनी तेहरानशी संपर्क साधून या विमानाची माहिती घेतली आणि विमानात बॉम्ब असल्याची अफवा खरी आहे का, अशी विचारणा केली.

काही मिनिटांतच तेहरानकडून विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेला पुष्टी नसल्याचे स्पष्टीकरण प्राप्त झाले. यानंतर हवाई दलाच्या विमानांनी या इराणच्या विमानाला चीनच्या ग्वांगझू शहराकडे जाण्यास परवानगी दिली. मात्र, यावेळी भारतातील सर्व एअरबेसना सतर्क करण्यात आले. आणि सुरक्षा यंत्रणांचे लक्ष होते. भारताची सुरक्षा अजूनही या विमानाच्या मार्गावर लक्ष ठेवून आहे. Flightradar24 या जगभरातील उड्डाणांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने सांगितले की, या विमानाने निर्धारित उंचीवरून दोनदा खाली येण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच, विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे लँडिंग होऊ शकले नाही.

First published:

Tags: Airplane, Travel by flight